प्रत्येक शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. जिम ,व्यायाम शाळा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स खेळाची मैदाने ,जलतरण तलाव हे फक्त वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील इतर कारणासाठी बंद राहतील. सामूहिक स्पर्धा किंवा कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील.
धार्मिक विधीमध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहण्यास परवानगी नाही. शहरातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
मास्क नाही तर प्रवेश नाही. दुकानात सुरक्षित अंतराचा नियम पाळूनच ग्राहकांनी लांब लांब उभे करावे, सोशल डिस्टन्सिंगचे ऑईलपेंटने रिंगण आखावे, असे आवाहन मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे.