तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आठवडाबाजार भरत असलेल्या गावात लोक एकत्र जमतात. यामुळे गर्दी होत असल्याने त्या-त्या गावातील आठवडाबाजार बंद ठेवण्याबाबत तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी प्रांताधिकारी शमा पवार यांना कळविले होते. त्यानुसार, ३० जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान भरणारे आठवडाबाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आठवडाबाजार भरणारी गावे
यामध्ये ३० जुलै (शुक्रवार) यशवंतनगर, तांदूळवाडी, निमगाव, बोरगाव, ३१ जुलै (शनिवार) धर्मपुरी, मांडवे, वेळापूर, मांडकी, एकशिव, १ ऑगस्ट (रविवार) मोरोची, सदाशिवनगर, दहिगाव, खुडूस, उंबरे-वेळापूर, २ ऑगस्ट (सोमवार) माळीनगर, अकलूज, फळवणी, शिंदेवाडी, ३ ऑगस्ट (मंगळवार) पिलीव, इस्लामपूर, ४ ऑगस्ट (बुधवार) नातेपुते, तोंडले, महाळुंग, फोंडशिरस, जांबुड, संगम, मळोली, ५ ऑगस्ट (गुरुवार) माळशिरस, नेवरे, वाघोली येथील आठवडाबाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रांताधिकाऱ्यांना आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा संघटनांवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.