सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज एक जून रोजी आठवडी बाजार बंद करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता ३० जून २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे.--------------तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदीकोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत. तंबाखूजन्य पदार्थ विक्री ३० जून २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत बंदी करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणा?्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आठवडी बाजार ३० जूनपर्यंत बंद; जिल्हाधिकाºयांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:15 PM
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेतला निर्णय; आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर होणार कारवाई
ठळक मुद्देकोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेशआदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिलालोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई