त्या काळामध्ये लखुजी जाधव यांनी मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरून साखर वाटून स्त्री जन्माचे स्वागत केले होते. त्यांचा आदर्श आज आपण घेण्याची गरज आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा, असे प्रतिपादन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे पिता लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, काकासाहेब देशमुख, ॲड. प्रमोद पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड, पदमाकर देशमुख,
सोमनाथ पवार, हर्षल देशमुख, नगरसेवक सुशील क्षीरसागर, भैय्यासाहेब भोसले, शाहूराजे देशमुख, ॲड. हिंदुराव देशमुख, सत्यवान देशमुख, विक्रांत देशमुख, प्रभाकर शिंदे, आकाश फाटे, संगीता फाटे, चैतन्य देशमुख, शुभांगी लंबे, सुधाकर शिंदे, जिब्राईल शेख, मदन लाळे आदी उपस्थित होते.
या बरोबरच शहरासह तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त खवणी येथे अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ७२ जणांनी रक्तदान केले. पोखरापूर येथे श्रीमंतयोगी प्रतिष्ठान पोखरापूर यांनी श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले.
या शिवाय शिवराजे प्रतिष्ठान मंडळ यशवंतनगर , शिवराज्य प्रतिष्ठान नागनाथ गल्ली शिवजन्मोत्सव मंडळ, शिवदीपक प्रतिष्ठान मंडळ, शिवशाही क्रांतीनगर शिवजन्मोत्सव मंडळ, श्री दत्त व कला व क्रीडा मंडळ दत्तनगर मोहोळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान कळसेनगर,
शिवबा प्रतिष्ठान बुधवार पेठ,
बालगणेश तरुण मंडळ गवत्या मारुती चौक, आदीसह तालुक्यात विविध ठिकाणी सामाजीक उपक्रम राबवित शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
फोटो २०मोहोळ-शिवजयंती
छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरण उद्घाटनप्रसंगी लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, संतोष गायकवाड, सोमनाथ पवार,पदमाकर देशमुख आदी.
----