शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

काय सांगता; सोलापुरातील ९० टक्के नागरिक ‘कागदोपत्री’ अविवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 1:06 PM

फक्त १० टक्केच नवविवाहितांकडून विवाह नोंदणी- चालू वर्षात ८१९ नवविवाहितांनी केली नोंदणी

ठळक मुद्दे२००० सालानंतर विवाह नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहेपण विवाह नोंदणी बाबत अद्याप जागरूकता नाहीगरज निर्माण झाल्यानंतर नागरिक विवाह नोंदणी

सोलापूर : आधार कार्ड दुरुस्ती, नावात बदल, पासपोर्ट तसेच इतर महत्त्वाच्या कामकाजाकरिता विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. सोलापूर महानगरपालिकेची शहरात आठ विभागीय कार्यालये आहेत. प्रत्येक विभागीय कार्यालय परिसरात प्रतिवर्षी ५०० ते ८०० विवाह होतात. विवाह प्रमाणपत्राकरिता प्रत्येक महिनाअखेर फक्त आठ ते दहा अर्ज येतात. यात आठ ते दहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्यांची संख्या अधिक असते, अशी माहिती विविध विभागीय कार्यालयातील सहायक विवाह निबंधकांनी दिली आहे. प्रतिवर्षी फक्त दहा टक्केच नवविवाहित विवाह नोंदणीकरिता अर्ज करतात. त्यामुळे सोलापुरातील आठ विभागीय कार्यालयातील ९० टक्के विवाहित नागरिक ‘कागदोपत्री’ अविवाहित आहेत, असेच म्हणावे लागेल.

२००० सालानंतर विवाह नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पण विवाह नोंदणी बाबत अद्याप जागरूकता नाही. फक्त अडचणीच्या वेळी किंवा गरज निर्माण झाल्यानंतर नागरिक विवाह नोंदणी करता विभागीय कार्यालयाकडे धाव घेतात.

चालू वर्षात आठ विभागीय कार्यालयाकडून ८१९ विवाह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सोलापूर शहराची एकूण लोकसंख्या

९ लाख ५१ हजार ८५८

पुरुष : ४ लाख ८१ हजार ६४

स्त्री - ४ लाख ३० हजार ४९४

(२०११ च्या जनगणनेनुसार)

जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली नोंदणी - ८१९

नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी

विवाह नोंदणीकरिता माहिती घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. बहुतांश लोकांकडून कागदपत्रांची पूर्तता होत नाही. विवाह नोंदणीकरिता तीन साक्षीदार, एक पुरोहित, वधू-वरांचे आधारकार्ड, पत्ता पुरावा, विवाह कार्ड, विवाह फोटो, सर्वांचे आयडी साईज फोटोज यासह विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. सहीकरिता सर्वांना विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात मराठी किंवा इंग्रजी भाषेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जातो. बहुतांश लोक कागदपत्रांच्या अभावामुळे विवाह नोंदणी करता अपात्र ठरतात.

विवाह नोंदणीकरिता येणाऱ्या अर्जांची संख्या प्रतिमहिना दहा ते बारा इतकीच आहे. आम्ही लोकांना नोंदणीकरिता आवाहन करतो. आलेल्या नवविवाहितांना किंवा त्यांच्या पालकांना विवाह नोंदणी बाबत प्रबोधन करतो. आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करतो. बहुतांश लोक माहिती विचारून जातात. पुन्हा कार्यालयाकडे फिरकत नाहीत. विवाह नोंदणीकरिता सुशिक्षित लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

- तेजस्विता कासार

सहायक विवाह निबंधक

विभागीय कार्यालय-८

..........

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाmarriageलग्न