काय सांगता; अजितदादांना सांगूनही महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 01:07 PM2021-07-24T13:07:48+5:302021-07-24T13:07:54+5:30
काळ्या फिती लावून केला शासनाचा निषेध : महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना आक्रमक
सोलापूर : आश्वासित प्रगती योजनेच्या ग्रेड वेतनातील तफावतीमुळे राज्यातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना अद्याप लागू झालेली नाही. अनेक वेळा निवेदने दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य मंत्र्यांसह आमदार, खासदारांबरोबर अनेकवेळा चर्चा होऊनही प्रश्न निकाली निघत नसल्याने महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून काम केले.
अनेकवेळा चर्चा होऊनही हा प्रश्न निकाली निघाला नाही. अनेक वेळा निवेदन देऊनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही आश्वासनाशिवाय अद्यापि, हा प्रश्न प्रलंबित आहे. मागील कित्येक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे काळ्या फिती लावून शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयीन कर्मचारी प्रकाश दिवानजी, सुनील चालवादी, पद्माकर शिंदे, अनिल प्याटी, बापू भोसले, आनंद व्हटकर, संतोष माळवदकर राजेंद्र हेडगिरे, दत्तात्रय पवार, नवनाथ आळंदे, प्रज्ञा हेंद्रे, सुरेखा कांबळे गणेश कविटकर नंदकुमार ढवळशंक, संतोष याटकर, नरेंद्र शिंदे, सचिन सोनवणे, लक्ष्मण खंदारे, जयराम सुरवसे, मनोहर सोमवंशी, अनिल अग्ने, इमाम लालखा, चिदानंद पाथरूड, प्रकाश घोडके, महेश सुरवसे, शीतलकुमार गवळी, रमेश नादरगी, चंद्रशेखर कल्याणकर, वैजनाथ स्वामी, राहुल कराडे, चंद्रकांत खानापुरे, महादेव वागदरी, नागेश पारसवार उपस्थित होते.