सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाकडे दहा हजार व्होटिंग मशिन्स असून, जास्तीत जास्त ६४ उमेदवार उभे राहिल्यास निवडणुकीचे नियोजन करता येणार आहे. दुसरीकडे यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास निवडणुकीचे नियोजन करताना अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय करणे अपेक्षित आहे, यासंदर्भात सोलापूर निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.
सकल मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ३०० पेक्षा जास्त उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय सतर्क झाले आहे.
सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा मतदारसंघात जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय करणे अपेक्षित आहे, यासाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही मार्गदर्शन मागवले आहे. त्यासंदर्भात पत्रदेखील पाठविले आहे. – गणेश निराळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर.