रविवारी मैंदर्गी शहर परिसरात जोरदार पाऊस झाला. गावातील गटारी वेळोवेळी स्वच्छ न केल्यामुळे पाऊस आल्यानंतर अनेक घरांत गटारीचे पाणी शिरले. नगरसेवक जैनुद्दीन हारकूड यांच्या आजूबाजूच्या घरात पावसामुळे गटारीतले पाणी शिरले. असे प्रकार पाऊस आला की नेहमीच घडतात. नगर परिषद प्रशासन, नगसेवकांमधून नागिरकांच्या समस्येकडे लक्ष वेधून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वेशीलगत असलेल्या दिवटे यांच्या दुकानापासून पडसलगी मेडिकलपर्यंत गटार तुंबल्यानंतर निचरा न झाल्यामुळे पाणी तुंबून नागिरकांना दुर्गंधी सहन करावी लागते. यासंबंधी नगर परिषदेकडे तक्रारही दिली आहे. लोकांच्या समस्यांचे निवारण करणे नगर परिषद प्रशासन, नगरसेवक, नगराध्यक्षांचे काम असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे नागिरकांमधून व्यक्त होऊ लागले आहे.
----
गटारी खोदली... तीन महिने लोटले
गावातल्याभर वेशीजवळ गटार खोदून ठेवली आहे. या प्रकाराला तीन महिने होत आहेत. यांच्या दुरुस्तीसाठी कोणालाही वेळ मिळेनासा झाला आहे. सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. यामुळे नगर परिषदेच्या मनमानी कारभाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
----
२१मैंदर्गी ०१,०२
गटार दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा तीन महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
पाऊस आल्यानंतर घरात शिरणारे पाणी.