सुशीलकुमार शिंदेंनी विकास केला असता तर मी मंत्री झालो नसतो; सहकारमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:41 AM2018-10-26T10:41:52+5:302018-10-26T10:43:28+5:30
जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत.
पंढरपूर : माजी कें द्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघेही जिल्ह्याच्या कोणत्याही फायद्याचे नाहीत, असे विधान केले़ याबाबत देशमुख म्हणाले, या महाशयांनी जिल्ह्याचा विकास केला असता तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्री म्हणून जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालीच नसती, अशी खोचक प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात दोन्ही देशमुख चांगल्या प्रकारे सेवा करीत आहेत. त्यामुळे बºयाच जणांना सध्या पोटदुखी झालेली आहे. कसं आहे की, मासा पाण्याबाहेर काढला की तो तडफडतो तसेच हे सध्या तडफडायला लागले आहेत.
पंढरपूर येथे भाजपा पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला़ त्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, देशात नरेंद्र मोदी तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ज्याप्रमाणे आम्ही लागू केल्या, त्याप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमध्ये निश्चितपणे शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना जास्तीत जास्त मदत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील सरकारमध्ये ‘दुष्काळ’ हा शब्द उच्चारण्याचेही धाडस होत नव्हते़ दुष्काळासारख्या परिस्थितीत ‘टंचाईग्रस्त’ असा शब्दप्रयोग करून ते दुष्काळग्रस्त जनतेची दिशाभूल करीत होते. मात्र सध्याचे सरकार ‘दुष्काळसदृश’ असा शब्द वापरत आहे.
दुष्काळ जाहीर करणे हे कें द्राच्या हातात असते. त्यामुळे आमचे सरकार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देण्यासाठी टंचाईग्रस्त असा शब्द न वापरता दुष्काळसदृश या शब्दाचा वापर करीत आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़ याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडीच्या शकुंतला नडगिरे, राजाभाऊ जगदाळे, शंतनू दंडवते उपस्थित होते.