सोलापूर : वाहन चालवताना कधी कधी जीवावर बेतू शकते याचं प्रत्यंतर मंगळवारी पहाटे एका ट्रॅक्टर चालकाला आले. ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टचालकाला पहाटेच्या गार वाºयाने अवचित डुलकी लागली अन् चक्क चालत्या वाहनावरुन खाली पडून तो जखमी झाला. यात त्याचा डावा कान तुटला. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या तांदुळवाडीजवळ पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सध्या साखर कारखान्यांचा हंगोम सुरु असल्यानं जिल्ह्यात सर्वत्र फडामध्ये ऊसतोड सुरु आहे. बैलगाड्यांपासून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक सुरु आहे. मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील शेतकºयाकडे ऊसतोड सुरु होती. सोमवारी दिवससभर तोडलेल्या ऊस फडात पडला होता. भल्या पहाटेच टोळीतील मजूर जागे झाले. त्यांनी ट्रॅक्टरमध्ये ऊस भरला आणि चालक विलास विनायक राठोडने (वय- ३०, रा. परळी, जि. बीड) याने बोचºया थंडीत स्टेअरींग पकडले आणि मंगरुळमार्गे अक्कलकोट तालुक्यातील गोकूळ शुगर कारखान्याकडे निघाला.
धोत्रीकडे जात असताना तांदुळवाडीजवळ गार वाºयाने ट्रक्टर चालवतानाच त्याला अचानक डुलकी लागली अन् चालत्या वाहनातून खाली पडला. तशातूनही खडबडून उठून चालत्या ट्रॅक्टरचा ताबा घेतला. तो बंद करुन रस्त्याच्या कडेला लावला. रस्त्याच्या बाजूने तो पडल्याने त्याच्या डाव्या हाताला, डोक्याला दुखापत झाली असून कान तुटला आहे. चालकाचा मित्र गंगाराम कसबे याने जखमी विलास याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.