तालुक्यातील 94 गावांच्या निवडणुका झाल्या आहेत. गावोगावी सत्ता निश्चिती झाली असली तरी सरपंचपद निश्चित झाल्यानंतर कोणत्या गटाचा सरपंच होणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या सोडतीकडे असणार आहेत.
१२९ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला तर सहा पुरुषांना संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी मिळणार आहे.
३५ ग्रामपंचायतींवर १८ महिला व १७ ओबीसी पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. ८२ ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण गटातील ४१ ठिकाणी महिला तर ४१ पुरुषांना संधी मिळेल.
दरम्यान, तहसीलदार स्तरावरून गावनिहाय आरक्षण काढले जाणार आहे. आरक्षण काढताना सर्वच चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात, २७ जानेवारी रोजी ११ वाजता शासकीय गोडावूनमध्ये ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
दरम्यान आरक्षण काढतेवेळी आमदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यांना निमंत्रित करावे. तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांनाही निमंत्रित करावे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केले. बार्शी तालुक्यात १३० ग्रामपंचायती असल्या तरी या टप्प्यांमध्ये ९४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या आहेत.