मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील एक एकर क्षेत्र विकत घेतलेल्या जमिनीच्या दस्तावर हरकत म्हणुन तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी हुलजंती मंडळ अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे यास १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आह़े.
तक्रारदारास जमीन खरेदीचे दस्तावर हरकत म्हणुन तक्रारी अर्ज आला होता. सदर हरकती अर्जावर तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे हा १० हजारांची लाच मागत होता.तक्रारदार यांनी लवंगी (ता.मंगळवेढा ,जि. सोलापूर) येथे एक एकर क्षेत्र विकत घेतले होते. सदर जमीन खरेदीचे दस्तावर हरकत म्हणुन तक्रारी अर्ज आला होता.
सदर हरकती अर्जावर तक्रारदार यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी मंडळ अधिकारी सत्यवान घुगे हे १० हजारांची लाच मागत असलेबाबत तक्रारदार यांनी तक्रार नोंदविली होती. त्यावरुन आज मंडळ अधिकारी सत्यवान घुगे , यांचेविरूध्द सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडून १० हजारांच्या लाचेची रक्कम स्विकारली असता. मंडळ अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे (वय ३४ वर्षे ) यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु आहे. सदरची सापळा कारवाई सोलापूर अँटी करप्शन ब्युरो टीमने केली आहे.