सोलापूर : शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात मात्र तेवढ्या प्रमाणात वाढत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात दोन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने रूग्णसंख्या २१ वर पोहोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे २१ रूग्ण उपचार घेत आहेत. अक्कलकोट २, बार्शी ३, करमाळा २, माढा ३, माळशिरस २, मंगळवेढा १, मोहोळ २, पंढरपूर ३, दक्षिण सोलापूर २ अशी रूग्णसंख्या आहे. रविवारी कोरोना अहवाल प्राप्त झाला त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीणमधील रूग्णसंख्या २१ वर पोहोचली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख ८७ हजार ४५७ कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ३ हजार ७३१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १ लाख ८३ हजार ७०५ एवढी आहे. सध्या २१ रूग्णावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.