वेंगुर्ले : प्रत्येकजण देवाकडे लहानपण मागत असतो. कारण लहान वयात कसलीच चिंता नसते. ना खाण्याची, ना पिण्याची. फक्त मज्जाच मजा; पण याला अपवाद आहे, तो सोलापूर येथील या मुलांचा. सोलापूर येथील ही मुलं कडकलक्ष्मीचा वेश धारण करून आपल्याच अंगावर चाबकाचे फटके मारत वेंगुर्ले शहरात पैसे मागत पोट भरत आहेत. ज्या वयात शिकायचं, खेळायचं, बागडायचं, सध्याच्या परिस्थितीनुसार फेसबुक, व्हॉटस्अॅपची मजा लुटायची, त्या वयात या मुलांना स्वत:चं पोट भरण्यासाठी कष्ट करावे लागत आहेत. सोलापूरमधील या दोघा मुलांमधून मुलाने आपल्याकडील उपलब्ध साधनांचा वापर करून कडकलक्ष्मीचा वेश घेतला आहे आणि मुलीने वाजविणाऱ्या वाद्याच्या तालावर मुलगा अंगावर चाबकाचे फटके मारत आहे. हे सर्व करून मिळणाऱ्या पैशांवर आपले जीवन जगविण्यासाठी कसरत करत आहेत. (प्रतिनिधी)
पोटासाठी ते सोसताहेत चाबकाचे फटके
By admin | Published: January 20, 2015 9:18 PM