याप्रकरणी नामदेव भीमराव गवळी यांनी परमेश्वर गायकवाड यांच्या विरोधात वैराग पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राच्या माहितीनुसार मंगळवारी नमदेव गवळी हे नेहमीप्रमाणे दोन म्हशी चारण्यासाठी व शेतात काम करण्यासाठी घेऊन गेले होते. दिवसभर शेतीचे काम करून व म्हशी चारून घराकडे येत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जाण्या येण्याच्या वाटेत शेती असलेले परमेश्वर रामभाऊ गायकवाड हे आडवे आले व तुझ्या म्हशी माझ्या शेतात का सोडल्या, असे म्हणून शिवीगाळ करू लागले. तेव्हा गवळी यांनी मी म्हशी शेतात सोडल्या नाही म्हटले. तरी शिवीगाळ करून खाली पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तेथे पडलेला दगड उचलून रक्त येईपर्यंत जोरात डोक्यात मारून जखमी केले. तसेच हातात कुऱ्हाड घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद नामदेव गवळी यांनी वैराग पोलिसात दिली आहे. त्यानुसार परमेश्वर गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.