याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलाचा विवाह डिसेंबर २०२० रोजी पैठण (जि. औरंगाबाद) येथील मुलीशी झाला होता. लग्न झाल्यानंतर ती दीड महिन्यानंतर माहेरी गेली ती पुन्हा नांदायला आली नाही. म्हणून वकिलामार्फत नांदण्यासाठी येण्याबाबत मुलाने पत्नीला नोटीस पाठवली होती.
तेव्हा सासरची मंडळी गुरुवारी (२२) दुपारी सून, तिची आई, भाऊ यांच्यासह बाप्पासाहेब कोकाटे, नितीन साळुंखे व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी पती व मुलाला ‘तुम्ही वकिलामार्फत नोटीस का पाठवली?’ असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. ‘आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत निघून गेले.
याबाबत सून, मुलाची सासू, सुनेचा भाऊ, सासरा सर्व (रा. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना कर्मचारी कॉलनी, पैठण) यांच्यासह बाप्पासाहेब कोकाटे, नितीन साळुंखे व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध घरात प्रवेश करून मारहाण केल्यामुळे गुन्हा नोंदला आहे.
----