मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक, उमेदवार समाधान आवताडे आदी उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी भाजपा सरकारने दूधाला अनुदान दिले. शेतकऱ्यांची वीज कधी तोडली नाही. साखर कारखान्यांना मदतीचे धोरण ठेवले. मात्र सध्याच्या सरकारने लॉकडाऊनच्या नावाखाली त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. मंगळवेढा तालुक्यातून यंदा भाकरी फिरवायची वेळ आली आहे. भाकरी फिरवली नाही तर करपून जाईल. संकटात जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचे रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले.
यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, विनायक जाधव, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, दामाजीचे संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, दूध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे, युन्नूस शेख, नंदकुमार हावनाळे, लक्ष्मण मस्के, प्रा. येताळ भगत, प्रा. दत्तात्रय जमदाडे, मच्छिंद्र भोसले आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविले
बारामतीकरांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना हक्काचे पाणी देण्याऐवजी त्या गावातील शेतकरी, नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे या फसव्या आघाडी सरकारपासून सावध राहा. मंगळवेढ्याच्या भूमीतील भूमिपुत्रास निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन आ. राम सातपुते यांनी केले.
फोटो ::::::::::::
विचार सभेत मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. समोर उपस्थित समुदाय.