अजय बळीराम गिराम (वय १९, रा.गोरमाळे, ता.बार्शी) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मयताची आई मंदाकिनी बळीराम गिराम (रा.गोरमाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा अजय दोघे कारी शिवारातील शेतात गेलो होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान हनुमंत उर्फ आबा कोंढारे, सुभाष शिंदे, रामा वाकडे, विशाल उर्फ सोन्या मोरे, धीरज मोरे, सुनील मोरे, सागर मोरे, रामलिंग उर्फ आबा मोरे (सर्व गोरमाळे) चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या शेतात आले व अजयला ‘तू महिलांना फोन काय करतोस, तुझा काय संबंध नाही, तुला लय माज आलाय,’ असे म्हणून त्याला बंधाऱ्यापर्यंत ओढीत नेले. हनुमंत कोंढारे यांनी केबल वायरने व इतरांनी काठीने, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अजय बळीराम गिराम यांनी घरातील कीटकनाशक प्राशन करून, आत्महत्या केली केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीनंतर अजयला प्रथम उस्मानाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना, १३ जुलै रोजी रात्री १०.३०च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पांगरी पोलिसात भादंवि ३०६,५०४, ५०६, ३४ अन्वये नोंदला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत.