दीपक दुपारगुडे, सोलापूर : अनेक पिढ्या दारिद्र्यात गेलेल्या, घरात कुणीही शिकलेलं नाही. दोन भाऊ मेंढपाळीचा व्यवसाय करतात. मात्र तिसरा अथक परिश्रमाने अखेर पोलिसात भरती झाला. प्रशिक्षणानंतर नुकताच लातूर येथे दीक्षांत संचलन पार पडले. यासाठी आई-वडील, नातेवाईक गावकऱ्यांचा टेम्पो भरून संचलनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
ग्रामीण भागामध्ये पोलिसांप्रति आदर आणि आकर्षक आजही कायम आहेत. सध्याच्या घडीला सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच गोरडवाडी (ता.माळशिरस) गणेश तानाजी हुलगे दहा वर्षांचा संघर्ष करून २०१९ मध्ये पोलिसात भरती झाला. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाउन पडल्यामुळे २०२२ ट्रेनिंग झाले. प्रशिक्षणानंतर वर्षानुवर्षे ज्या भागात मेंढपाळी केलेल्या आई-वडिलांनी याच ठिकाणी मुलाच्या दीक्षांत संचलन कार्यक्रमासाठी आई-वडिलांनी मोठ्या हौसेने टेम्पो भरून गावकऱ्यांना लातूर येथे शपथविधीसाठी नेले. भारावलेल्या गावकरी नातेवाइकांनी आनंद व्यक्त केला.
शिक्षणापासून वंचित राहिल्याचा त्रास आम्ही सोसलाय. त्यामुळे मुलगा चांगल्या नोकरीत लागावा, यासाठी पहिल्यापासून इच्छा बाळगली होती. ती आज मुलगा पोलिस पदावर शपथ ग्रहण करताना पूर्ण झाली. -तानाजी हुलगे, वडील.