सोलापूर : अनैतिक संबंधाला अडथळा येणाºया पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने खून केल्याप्रकरणी फिरस्त्या डॉक्टरासह आठ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी दोषी धरले आहे. यावर बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.
नरहरी रामदास श्रीमल (वय ३४, रा. लक्ष्मीनारायण थिएटरच्या पाठीमागे, श्रीरामनगर, सोलापूर), विनोदा नागनाथ संदुपटला (वय ३३, रा. घर नं. ६५१/१ अ-विभाग, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), महादेवी बसवराज होनराव (वय ३५, रा. २८१/१ अ-विभाग, विडी घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), अंबुबाई भीमराव कनकी (वय ३८, रा. २५४, सुंचू विडी घरकुल, कुंभारी), बालाजी दत्तात्रय दुस्सा (वय २३, रा. प्लॉट नं. ३५, विनायकनगर), अमर श्रीनिवास वंगारी (वय २५, रा. १२७/३ अ-विभाग, विडी घरकुल, कुंभारी), नरेश अंबादास मंत्री (वय २२, रा. सिद्धाराम मठाशेजारी, विनायकनगर, विडी घरकुल, कुंभारी), अंबादास किसन ओत्तूर(वय २१,रा़ सिद्धाराम मठाशेजारी, विनायकनगर) अशी दोषी धरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नरहरी श्रीमल व विनोदा संदुपटला यांचे अनैतिक प्रेमसंबंध होते. याची माहिती नरहरी श्रीमल याची पत्नी प्रवलिका हिला समजली. हा प्रकार प्रवलिका हिने माहेरच्या लोकांना सांगितला़ त्यामुळे नरहरी श्रीमल हा तिच्यावर चिडून होता. पती नरहरी व पत्नी प्रवलिका या दोघांमध्ये नेहमी वाद होऊ लागला. वादाला कंटाळून नरहरी याने तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. १२ आॅगस्ट २0१७ रोजी दुपारी २.३0 वाजता नरहरी याने पत्नी प्रवलिका हिला देवकार्याचा बहाणा करून मोटरसायकल (क्र.एम.एच-१३ बी-५६५८)वरून अंबुबाईच्या घरी आणले. घरात विनोदा संदुपटला व तिची मैत्रीण महादेवी होनराव या होत्या. सर्वांनी गप्पा मारत ३.३0 वाजता प्रवलिका उर्फ सोनी हिला नरहरी याने खाली पाडले. अंबुबाई हिने तिचे दोन्ही पाय पकडले. विनोदा हिने गळ्याला फास दिला. महादेवी ही तिच्या अंगावर बसली तर नरहरी याने मानेवर लाथा घालत तिचा जीव मारला.
प्रवलिका हिचे प्रेत निळ्या बॅरेलमध्ये टाकून छोटा हत्ती (क्र.एम.एच-१३ ए.एन-९११८)मधून विनोदा संदुपटला हिच्या घरी आणले. रात्री ८ वाजता घराच्या कंपाउंडमध्ये खड्डा करून पुरले होते. या प्रकरणी आरोपींविरूद्ध खुनाचा कट रचून, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे एकूण २0 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी प्रत्यक्षदर्शी पुरावा आरोपींच्या विरूद्ध नसला तरी, परिस्थितीजन्य पुरावा सरकार पक्षाच्या बाजूने आहे. प्रवलिका हिचा मृतदेह आरोपीच्या घरात कसा आला हे सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी आरोपीची आहे. गुन्ह्याची कबुली आरोपींनी साक्षीदारांसमोर दिली आहे, असा युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपींतर्फे अॅड. एम.आय. कुरापाटी, अॅड. ए.ए. ईटकर, अॅड. ए.एन. शेख यांनी काम पाहिले.
पत्नी गायब असल्याची दिली होती तक्रार...- पत्नी प्रवलिका हिचा खून केल्यानंतर पती नरहरी याने १५ आॅगस्ट रोजी पत्नी भाजी आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही, अशी फिर्याद वळसंग पोलिसांत दिली होती. विनोदा हिच्या घराजवळ पुरण्यात आलेले प्रेत तहसीलदाराच्या उपस्थितीत काढण्यात आले. रासायनिक शाळेचा पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून आठ आरोपींना दोषी धरण्यात आले आहे. बुधवारी होणाºया न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.