कुसळंब (ता़ बार्शी, जि़ सोलापूर): पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला. विशेष म्हणजे स्वत: खून केल्यानंतर पतीचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची तक्रारही पोलिसांत दिली. मात्र, पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणून वंदनाला अटक केली.ही घटना तांदळवाडी (ता. बार्शी) येथील अतुल गरड यांच्या शेतात घडली. भाऊसिंग अनारसिंग मोरे (वय ३५) असे मृताचे नाव असून तो मूळचा लिंबेवाडी (जि. बुलढाणा) येथील रहिवासी आहे. मृत भाऊसिंग हा अतुल गरड यांच्याकडे सालगडी म्हणून कामावर होता़ तो आपली पत्नी वंदना (३०) आणि तीन मुलांसह शेतातच राहत होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.या मधून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घातला. मुले जागी झाल्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पत्नीने केला पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 4:12 AM