सोलापूर : पगार व घर नावावर कर म्हणून महिला पोलिसाचा छळ केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलातील शिपाई व त्याच्या आईविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस शिपाई कमल कोरे (वय ४०, रा. १०, एकतानगर, वालचंद कॉलेजजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विजयकुमार कोरे व सासू शकुंतला कोरे या दोघांविरुद्ध मारहाण, धमकावून छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कमल या शहर पोलीस दलात तर आरोपी विजयकुमार हा ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. आरोपींनी २६ डिसेंबर २0११ पासून ६ जून रोजी सकाळी १0 या वेळेत मारहाण करून मानसिक त्रास दिला आहे. तुझ्या नावावर असलेले घर माझ्या नावावर कर व पगार आम्हाला का देत नाही म्हणून वेळावेळी मारहाण केली. शुक्रवारी सकाळी या दोघांनी मारहाण केल्यावर कमल यांनी पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास सपोनि वेळापुरे करीत आहेत.