श्रावण महिन्यामध्ये निसर्ग अत्यंत नयनरम्य, हिरवेगार, मनाला आनंद देणारे आणि आल्हादकारक वातावरण असते. या काळात वन्यजीवनात अनेक बदल पहावयास मिळतातत्न या मोसमात आपल्या सर्वांची सकाळ ही पक्ष्यांच्या किलबिलाटाने व त्यांच्या मधुर गाण्याने सुरुवात होते. दयाळ, हळद्या, नाचण शिंपी पक्षी असे अनेक पक्षी सुमधुर गाण्यांनी आणि आपल्या रंगीबेरंगी रंगाची उधळण करीत जोडीदारांना आकर्षित करीत असतात. श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त आवाज कोकिळेचा ऐकावयास मिळतो.
श्रावणात सुरुवातीला चातक (पावशा) हा पक्षी निसर्गामध्ये ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ ही आरोळी देत पावसाच्या आगमनाची जणू सूचनाच सर्व शेतकरी बांधवांना देतो. पावशा पक्षी हा आफ्रिकेतून स्थलांतर करून दक्षिण भारतात येतो. तेथून तो मान्सूनच्या वाºयाच्या प्रवाहाबरोबर हळूहळू मध्य भारत आणि उत्तरभारतात प्रवास करतो. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वत:ची अंडी बºयाचदा दुसºया पक्षांच्या घरट्यामध्ये अत्यंत शिताफीने आणि चाणाक्ष पद्धतीने घालतात. उदाहरणार्थ ते सातभाई या पक्षाच्या घरट्यामध्ये ती अंडी घालतात आणि त्यांच्या पिलांचे संगोपन हे सातभाई पक्षी करतात.
पाकोळीसह काही पक्षी हे पावसाळा सुरू झाल्यानंतर घरटी बांधण्यात मग्न असतात. पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर श्रावणात पक्ष्यांमध्ये अनेक बदल दिसतात. त्यांच्या पिसांच्या रंगात बदल, वर्तुणुकीमध्ये बदल पाहावयास मिळतात. प्रत्येक पक्षी आपापल्या घरट्यात पिलांना आहार देण्यासाठी संपूर्णपणे कार्यरत असतो असतात. पक्षांना निसर्गामध्ये त्यांना लागणारा आहार कीटक,अळ्या, बेडूक, सरडे, किडे-मुंग्या कोळी वगैरे. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पिल्लांची वाढ लवकर आणि व्यवस्थित होते.
या महिन्यात राष्ट्रीय पक्षी मोर हा आपणास त्यांचा पिसांचा डोलारा उभा करून नाचताना पहावयास मिळतो. या काळात मोरांच्या विणीचा संगम असतो. मोर हा पक्षी पाऊस आल्यानंतरच का नाचतो? या मागचे प्रमुख कारण पावसामध्ये जेव्हा हे स्फटिके ओलसर होतात तेव्हा या पिसावरील स्फटिके प्रखरपणे चमकतात म्हणूनच मोर पावसात पिसारा फुलवून नाचतो.
श्रावण महिन्याच्या शेवटी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडत असताना पक्षी नेमके काय करत करतात ? अशा वातावरणात पक्षांना प्रामूख्याने दोन गोष्टीचा धोका असतो एक अंग गारठून जाणे आणि दोन उपासमार होणे. ह्या वातावरणात सर्व पक्षी आपल्या पिसांच्यामधील अंतरात हवेचे छोटे कप्पे तयार करतात त्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहते. जर पाऊस सतत पडत तर त्यांना अन्न शोधण्याता प्रचंड कष्ट करावे लागते. यामध्ये त्यांची ऊर्जा सुद्धा कमी होते. पावसामध्ये पक्षी सुरक्षित जागेत आसरा घेतात पण काही पक्षी हे झाडावरच बसून राहतात. यावेळी ते त्यांचे पायांच्या बोटातील नसाने फांदीला घट्ट धरून करून बसतात. नसा घट्ट झाल्यानंतर ते कितीही वारा आला तरी झाडावरून पडू शकत नाहीत.
एकंदरीत श्रावण महिन्यामधील सुंदर आणि आल्हादकारक वातावरणाचा फक्त मनुष्यांप्राणी नव्हे तर संपूर्ण वन्यजीवनातील घटक त्याचा आनंद लुटताना पाहावयास मिळतात.- डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ अन् छायाचित्रकार आहेत.)