आप्पासाहेब पाटील
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. ६ जून २००५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. सोलापूर शहरात महावितरणचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. ग्राहकांना मिळणाºया सेवासुविधा याबाबत नव्याने रूजू झालेले महावितरणचे शहर अभियंता प्रसन्न कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.
प्रश्न: आपण यापूर्वी कोणकोणत्या पदावर काम केले आहे.उत्तर : मी मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहे़ मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर महावितरण कंपनीत शाखा अभियंता पदावर रूजू झालो़ मी यापूर्वी फलटण, वाई, पुणे, पुणे शहर, वसई, पालघर याठिकाणी विविध पदाचा कार्यभार सांभाळला आहे़ आता सध्या माझी सोलापूर शहर अभियंता (कार्यकारी) या पदावर नियुक्ती झाली आहे.
प्रश्न: ग्राहकांना तत्पर सेवा देण्याबाबत आपला कसा प्रयत्न असणार आहे.उत्तर : ग्राहकांना २४ तास सेवा देणे कंपनीचे कर्तव्य आहे़ त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असतो. अचानक काही कारणास्तव वीज बंद पडते अन् ग्राहकांच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आता शहरातील प्रत्येक ट्रान्स्फॉर्मर (डीपी) वर ठळक अक्षरात जनमित्रांचे पूर्ण नाव व त्याचा मोबाईल नंबर देण्यात येणार आहे. त्यामुळे वीज गेल्यास संबंधित जनमित्रास ग्राहकांनी कळविल्यास अवघ्या ३० मिनिटात वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे़ याशिवाय त्या त्या भागातील शाखा अभियंता व संबंधित जनमित्रांचे मोबाईल नंबर असलेले फलक शासकीय कार्यालयात लावण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे तत्पर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
प्रश्न : महावितरणमध्ये सुधारणा काय काय होणार ?सध्या ग्राहकांकडून वीज बिल चुकीचे येत असल्याच्या तक्रारी येत आहेत़ या चुका सुधारून ग्राहकांना वेळेत व बरोबर बिल पाठविण्यासाठीच्या कामांना माझे पहिले प्राधान्य असणार आहे़ रिडिंग घेणाºया प्रक्रियेत सुधारणा करून त्यात जलद गतीचा कारभार करू़ लवकरच शहरात बदल होतानाचे दिसून येईल असेही कुलकर्णी यांनी सांगितले
कंपनीची ध्येय धोरणे व ग्राहकांचा मिलाफ घडविणारकंपनीचे काही नियम आहे़त. या नियमात बसून काम करताना ग्राहकांना या नियमानुसार जलद, तत्पर सेवा देण्याचे काम करणार आहे़ शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाºया नव्याने वीजजोडण्या, मीटर बदलणे, शेतीपंपासाठी जलद वीजजोडणी देण्यासाठी यापुढे काम करणार असल्याची माहिती प्रसन्न कुलकर्णी यांनी दिली.