शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

विजयपूर जिल्ह्यामधील जाहीर सभांची गर्दी मतांमध्ये परावर्तीत होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 8:15 PM

राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधानांसह देशपातळीवरील तसेच विविध राज्यांतील नेते प्रचारसभा गाजवत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

ठळक मुद्दे नेत्यांच्या प्रचारसभांना नागरिकांची मोठी गर्दीउमेदवाराला मतदान करण्याचे भावनिक आवाहन राज्यामध्ये अनेक ठिकाणी तिरंगी लढती

सोलापूर / विजयपूर : विजयपूर जिल्ह्यामध्यें ४३ टक्के उष्म्याबरोबर २०१८ विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणूक १२ मे रोजी होणार असून विविध पक्षातील उमेदवारांच्या प्रचाराला गती आली आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते गावे पिंजून काढत आहेत. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी पंतप्रधानांसह देशपातळीवरील तसेच विविध राज्यांतील नेते प्रचारसभा गाजवत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या नेत्यांच्या सभांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र ही गर्दी मतांमध्ये कशी परावर्तीत होणार, हा औत्सुक्याचा विषय आहे.

अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, चित्रपट नायक-नायिका, पंतप्रधान, दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांना नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तसेच त्यांच्या विधानांना टाळ्याही मिळत आहेत. संबंधित पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी व्हावी म्हणून जीवाचा आटापिटा करत आहेत. आपल्याच सभेला मोठी गर्दी व्हावी, यासाठी उमेदवारांकडून प्रलोभने दाखविण्यात येत असल्याची चचार्ही ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे सभांना उपस्थिती लावणारे संबंधित उमेदवारांनाच मत देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणूक म्हटली की पदयात्रा, प्रचारफेºया, सभा या ठरलेल्याच असतात. अनेक उमेदवारांच्या  पदयात्रा, प्रचारसभांना गर्दी होताना दिसत आहे. 'आवाज कोणाचा...' 'येऊन, येऊन येणार कोण...' असे नारेही सभांमधून ऐकावयास मिळत आहेत. प्रचारासाठी येणारे दिग्गज नेते आपला उमेदवारच 'लय भारी' असल्याचे विजयपूर जिल्'ांतील मतदारांच्या मनावर बिंबविण्यासाठी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत. एखाद्या भागात गेल्यानंतर तेथील स्थानिक भाषेमधून भाषणाला सुरूवात करून आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे भावनिक आवाहन करत आहेत. त्याचबरोबर विरोधकांची उणीधुणी काढून टाळ्या मिळविण्यात येत आहेत. 

सभांना नागरिकांची मोठी गर्दी करून विरोधकांच्या मनात धडकी भरविण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दिग्गज नेत्यांच्या रोड  शोचे आयोजन करूनही मतदारांवर प्रभाव पाडण्यात येत आहे. निवडणूक झाली की काही उमेदवारांचे दर्शन दुर्मीळ होते. निवडणूक जाहीर की लोकप्रतिनिधी, नेते पुन्हा सक्रीय होतात. दिग्गज नेत्यांना आणून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होेतो. काहीजण मतदारांना गृहीत धरतात. मात्र, त्याचा  फटका त्यांना निवडणूक निकालानंतर बसतो.

सध्याचे मतदार सूज्ञ असून नेत्यांच्या भंपकगिरीला ओळखून आहेत.  त्यामुळे  सभा, रोड शोना होणारी गर्दी ही मतदानामध्ये दिसणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सभांना होणारी गर्दी पाहून काही उमेदवार हुरळून जातात. मात्र मतदारराजाच्या मनात काय चाललंय याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रचारसभांना होणारी गर्दी पाहून निकालाचे आडाखे बांधण्यात येत आहेत. अमूक पक्षाच्या उमदेवाराचा विजय निश्चित आहे. त्याच्या सभांना बघा किती गर्दी आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. पण शेवटी निकालानंतर मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे़

अनेक नेत्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होते. मात्र, मतदानावेळी त्यांच्याविरूद्ध कौल लागतो. अशी अनेक उदाहरणे विविध निवडणुकांमधून पाहायला मिळाली आहेत. निवडणुकींचा इतिहास पाहिल्यास दिग्गजांनाही मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे.  त्यामुळे सभेला गर्दी झाली म्हणजे मतदारांचा कौल त्या उमेदवाराच्या बाजूने आहे, असे म्हणणे रास्त ठरणार नाही. दिग्गजांच्या प्रचाराच्या तोफा मैदाने गाजवत आहेत. मात्र, शेवटी मतदार हाच  राजा आहे. 

आपल्या  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. त्यांनी चार वर्षात काहीही केलेले नाही. कर्नाटकात काँग्रेस सरकारला स्पष्ट बहुमत मिळणार असून कर्नाटकच्या निकालाने देशाला वेगळी दिशा मिळेल, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. आपल्या सभांमध्ये त्यांनी भाजपवर टीका केली.सिद्धरामय्या पुढे म्हणाले,  गतवेळी सत्तेत असलेल्या भाजपला विकास करणे शक्य होते. आता केवळ बिनबुडाचे आरोप करण्याचे काम करण्यात येत आहे. काँग्रेस सरकार भ्रष्ट असल्याचे आरोप अमित शहा आणि नरेंद्र मोदी करतात;  पण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली येडियुराप्पा जेल भोगून जामिनावर बाहेर आहेत. मोदींनी सांगितलेला विदेशातील काळा पैसा कोठे आहे? २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे भाष्य करणाºयांना २ लाखही रोजगार देता आलेले नाहीत. 

भाजपच्या जाहिराती फसव्या आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले, भाजपमुळे दलित आणि बहुजन समाज अधोगतीकडे जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे भाजपचे तळागाळातूनच उच्चाटन करा.काँग्रेस प्रचारासाठी जात असताना ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तिरंगी लढती असल्या तरी त्यामध्ये काँग्रेस व भाजपमध्य लढती होणार आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस