कृषीभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे यांनी विकसित केलल्या किंगबेरी द्राक्षवाणाचे लोकार्पण सोहळा खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदिधाकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला आ. प्रशांत परिचारक यांचे बंधू व युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी हजेरी लावली. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधान मतदारसंघात शनिवारी दिवसभर चर्चा होती.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार सरकोलीत आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांना उमदेवारी जाहीर करा, अशी मागणी केली होती. मात्र शरद पवार यांनी पंढरपूर - मंगळवेढा मतदारससंघांच्या आमदारकीच्या उमदेवारीबाबत नंतर बघू आता फक्त एकच पंढरपुरातील कारखानदारी सुधाराची आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचबराबेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोटनिवडणुकीच्या विषयावर बोलणे टाळले होते. आ. रोहित पवार यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्यानंतर पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाचे नेते संपकार्त असल्याचा सांगितले होते.
उमेश परिचारक हे युटोपियन शूगरच्या माध्यमातून मंगळवेढ्यात अधिक लक्ष घालत आहेत. त्यामुळे आता आमदारकी पुढच्या दरवाज्याने मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा पंढरपूरमध्ये होती.
कोट ::::::
दिवंगत नानासाहेब काळे यांच्याशी परिचारक कुटुंबाचे जुने संबंध आहेत. नानासाहेब व माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांचे सलोख्याचे संबंध होते. तो घरगुती कार्यक्रम होता. त्यामुळे कार्यक्रमाला गेलो होतो. त्याठिकाणी शरदचंद्र पवार यांच्याशी भेट झाली. यामध्ये गैर काही नाही. लोक चुकीचा अर्थ काढत आहेत.
- उमेश परिचारक,
चेअरमन, युटोपियन शुगर, मंगळवेढा