वैराग : शनिवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका वैरागसह भोवतालच्या अनेका गावांना बसला आहे. तसेच अवकाळी पावसासह सरी कोसळल्या. याशिवाय आंबा उत्पादकाला खूप मोठा फटका बसला आहे.
या वादळी वाऱ्यात काही छोट्या व्यावसायिकांचे पत्राशेड उडून गेले. शहराबाहेर भागवत वाघ यांच्या हाॅटेलचे ६० ते ७० पत्रे उडून आतील साहित्य आणि शेती उपयोगी साहित्यांची नासधूस झाली. या वादळी वाऱ्यात त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. कोरोनाने त्रस्त असलेल्या शेतकरी व व्यावसायिकांवर या वादळी वाऱ्याच्या संकटाने त्यात भर घातली आहे.
शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळी सहानंतर अवकाळी पावसाच्या सरी वैरागसह सर्वदूर कोसळल्या. अनेकांच्या वस्त्यांवरील पत्रे उडाले आहेत. यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
----
फोटो : ०७ वैराग
वादळी वाऱ्याने शनिवारी वैरागला झोडपून काढले. शहराबाहेर हॉटेलसह अनेक वाड्या वस्त्यांवरील पत्रे उडाले.