११ सदस्यांनी अर्ज भरायचे, असा गावाचा एकमुखी ठराव झाला होता. तरीही २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; पण त्यातील १५ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्यानंतर ग्रामदैवत श्री शेखा गौरी मंदिरात जाऊन सर्व ग्रामस्थांनी दर्शन घेऊन गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. बिनविरोधसाठी राजेंद्र सरवदे, विक्रीकर उपआयुक्त रामभाऊ थोरात, सेवानिवृत्त डीवायएसपी श्रीमंत थोरात, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब काटे, पंचायत समिती सदस्य धन्यकुमार साखरे, संतनाथ खंडागळे, पिंटू पाडूळे, ममशाद मुजावर, वामन काटे, दादा खंडागळे, विष्णू साखरे, पांडुरंग सलगर, सुनील सलगर, अनिल पाटील, अशोक काटे, विश्वनाथ दहीडकर यांनी परिश्रम घेतले.
बिनविरोध सदस्य : मंदाकिनी कावरे, रामलिंग घेवारे, पूजा नरुटे, नवनाथ गवळी, सैनाभी मुजावर, संध्या होनराव, हनुमंत होनमाने, अनिता खंडागळे, लहु काटे, विष्णू चव्हाण, अरुणा कुलकर्णी.
फोटो
०४मालवंडी०१
मालवंडी, ता. बार्शी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना ग्रामस्थ.