शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

दोन दिवसात सोलापूर शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली, मनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 12:15 PM

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेत दुसºया दिवशी एक दर्गाह, एका बुद्धविहारासह ४७ स्थळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने हटविली.

ठळक मुद्देशहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेला ६ नोव्हेंबरपासून सुरुवातमनपा, शहर पोलीसांची संयुक्त कारवाई तीन ठिकाणी धार्मिक स्थळे स्वत:हून संबंधितांनी काढून घेतली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेत दुसºया दिवशी एक दर्गाह, एका बुद्धविहारासह ४७ स्थळे मनपा व पोलिसांच्या संयुक्त पथकाने हटविली.शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ११ अनधिकृत स्थळे हटविण्यात आली. कन्हैयाकुमारच्या सभेला पोलीस बंदोबस्त दिल्याने ७ नोव्हेंबर रोजी मोहीम घेता आली नव्हती. बुधवारी ही मोहीम पुढे सुरू ठेवण्यात आली. या मोहिमेत तीन ठिकाणी धार्मिक स्थळे स्वत:हून संबंधितांनी काढून घेतली तर ४४ ठिकाणी जेसीबीने पाडकाम मोहीम राबविण्यात आली. यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. आजच्या मोहिमेत कुठेही विरोध झाला नाही. सायंकाळपर्यंत ही मोहीम शांततेत पार पडल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. पोलीस ठाणेनिहाय हटविण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. एमआयडीसी: हैदराबाद रोड विडी घरकूल— नवनीत तरुण मंडळ, म्हैसम्मा मंदिर बी व सी ग्रुपमधील दोन, गणेश मंदिर, मसोबा मंदिर, लक्ष्मीराज गणेश मंडळ, पोशम्मा मंदिर, गुरूदत्त मंदिर, स्वयंभू हनुमान मंदिर समतानगर, गणेश मंदिर ब्रह्मनाथनगर, यल्लम्मा मंदिर सग्गमनगर, हनुमान मंदिर मल्लिकार्जुननगर, लक्ष्मी मंदिर, कल्पनानगर, दत्त मंदिर जुना अक्कलकोट नाका, मारुती मंदिर, शक्ती गणेश मंदिर जुना कुंभारी नाका, महालक्ष्मी मंदिर गुल्लापल्ली कारखान्याजवळ, देवी मंदिर आदित्य फार्मास्युटिकलजवळ, पोशम्मा व हनुमान मंदिर आशानगर, स्कंदमाता मंदिर न्यू सुनीलनगर, महादेव मंदिर करली चौक, अंबिका मंदिर विजयलक्ष्मीनगर.विजापूर नाका: मरिआई मंदिर, वज्रबोधी बुद्धविहार माजी सैनिकनगर, यल्लम्मा मंदिर जवाननगर, नागनाथ मंदिर पारधी वसाहत, अंबाबाई मंदिर बनशंकरी चौक, गणेश मंदिर कोळी समाज सोसायटी, रेणुका देवी संभाजी तलावाजवळ, ओंकारेश्वर मंदिर जनता बँक कॉलनी, दत्त मंदिर सैफुल, हनुमान मंदिर सैफुल भाजी मंडई, महालक्ष्मी व म्हसोबा मंदिर यामिनीनगर, मौलाली पीरअल्ली अबुबकरअली दर्गा गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १, दत्त मंदिर हरळय्यानगर. या कारवाईत झोन अधिकारी चोबे, आवताडे, अवेक्षक बाबर, खानापुरे, गोडसे, गुंड, दिवान यांच्यासह जेसीबी, डंपर, वायरमनसह १५० कर्मचाºयांचा ताफा होता.---------------------स्वत:हून केले पाडकामनीलमनगर भाग १ मधील फरशी बोळ येथे असलेले शिव व देवीचे मंदिर संबंधितांनी स्वत:हून काढून टाकले. त्याचबरोबर ताई चौकाजवळील इरण्णा वीरगोंडा यांच्या घराजवळ असलेले श्रीकृष्ण मंदिर भक्तांनी स्वत:हून काढून टाकले. याबाबत तेथील नागरिकांची समजूत घालण्याचे काम अवेक्षक खानापुरे यांनी केले. अशाप्रकारे दोन दिवसांच्या मोहिमेत ५८ अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत. आता आणखी १७५ स्थळे राहिली आहेत. --------------------अशांनी अर्ज करु नये१९६0 च्या आधी खासगी जागेत असलेल्या धार्मिक स्थळांबाबत अनेकांनी पुरावे सादर करण्यास सुरूवात केली आहे. असे अर्ज सुनावणीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्ता किंवा जागेवर असलेली धार्मिक स्थळे नियमित करता येत नाहीत. त्यामुळे अशा स्थळांशी संबंधित असलेल्यांनी व नोटिसा मिळालेल्यांनी ही स्थळे स्वत:हून काढून घ्यावीत, अन्यथा या पथकामार्फत ती काढून टाकण्यात येणार आहेत, असे आवाहन करण्यात आले आहे.