शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सोलापूर जिल्ह्यातील ११८९ अंगणवाड्या शौचालयाविना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:55 AM

सोलापूर : जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र सुरू होऊन ४५ वर्षे होत आली तरी ११८९ अंगणवाडी केंद्रात शौचालय नाही तर अजूनही ...

ठळक मुद्देअंगणवाडी केंद्रातून सुमारे दोन लाख बालके प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेतअंगणवाडी केंद्र सुरू होऊन ४५ वर्षे होत आली तरी ११८९ अंगणवाडी केंद्रात शौचालय नाही६७६ अंगणवाड्यांना छत नसल्याने लहान मुले उघड्यावर शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवताहेत

सोलापूर : जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र सुरू होऊन ४५ वर्षे होत आली तरी ११८९ अंगणवाडी केंद्रात शौचालय नाही तर अजूनही ६७६ अंगणवाड्यांना छत नसल्याने लहान मुले उघड्यावर शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवताहेत. 

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी नुकताच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाºया अंगणवाड्यातील सुविधांचा आढावा घेतला. जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर :१ व २, सांगोला, कोळा, उत्तर व दक्षिण सोलापूर या ठिकाणी ३२६९ इतक्या मोठ्या अंगणवाड्या आहेत. यामध्ये स्वत:ची इमारत असणाºया २५९३ इतक्या अंगणवाड्या आहेत. ६७६ अंगणवाड्यांना इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्रातील मुले उघड्यावर शिक्षणाचे प्राथमिक धडे घेतात. पावसाळा व थंडीत या केंद्रातील मुलांचे हाल होतात. गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही वस्तुस्थिती आहे. 

केवळ १३३ अंगणवाड्यात वीज कनेक्शन आहे तर ३१३६ इतक्या अंगणवाड्यांमध्ये वीज कनेक्शन नाही. सरकार शहर व गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर योजना राबवत आहे. पण अद्याप ११८९ इतक्या अंगणवाड्यात शौचालय नाही. फक्त ३६१ अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी मिळते. २९०८ अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी पिण्याची सोय नाही. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार उपलब्ध केला जातो. तरीही १५८१ अंगणवाडी केंद्रात गॅस शेगडीची उपलब्धता नाही. शासन दरवर्षी हातधुवा दिन साजरा करते. हात धुण्यामुळे अनेक रोगांचा प्रतिबंध होऊ शकतो याचा प्रसार केला जातो. पण ३0७३ इतक्या अंगणवाड्यात हात धुण्यासाठी वॉश बेसीन उपलब्ध नाही. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राची आज अशी अवस्था आहे. 

हे चित्र बदलणारच्जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातून सुमारे दोन लाख बालके प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत. पण याच केंद्राची ही दुरवस्था आहे. शिक्षणाबरोबर बालकांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी काळात हे चित्र बदलण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. वित्त आयोग, ग्रामपंचायतीकडील निधी व लोकवर्गणीतून अंगणवाड्यात या सुविधा उपलब्ध केल्या जातील. तशा सूचना महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अंगणवाड्यांना शौचालय, वॉटर फिल्टर, गॅस शेगडी आणि वीज कनेक्शन देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदEducationशिक्षणchildren's dayबालदिन