सोलापूर : तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.बीएमआयटी महाविद्यालयाच्या विचार मंथन कार्यक्रमात प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते़ यावेळी त्यांनी पत्रकार समीरण वाळवेकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनी मोकळेपणे उत्तरे दिली.निकम म्हणाले की, पोलिसांकडून फार अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे़ कारण हे लोक बंदोबस्तात, कायदा सुव्यस्था राखण्यात व्यग्र असतात. तपास यंत्रणेत सोयीचे होण्यासाठी पोलिसांना कायद्याचे शिक्षण द्यायला हवे.
कोर्टात साक्षीदारला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे - उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:33 PM