रविवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिवारातील तलावाजवळ ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शांतप्पा बसवणप्पा देशेट्टी (रा.काझीकणबस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, यातील शांतप्पा आणि संगीता हे दोघे नात्याने चुलते पुतणे असून, काझीकणबस शिवारात पाण्याच्या तलावाजवळ त्यांची शेती आहे. दोघांच्या शेतीत सामाईक बांध आहे. ही बांध देशट्टीने वारंवार फोडल्याचे कारणावरून यापूर्वी तक्रार झाली होती. त्यावेळी देशेट्टीने संगीताला बघून घेतो, अशी धमकी दिली होती.
या सामाईक बांधावरून त्यांच्यात वाद झाला आणि संगीताच्या गळ्यावर, मानेवर, उजव्या हाताचे दंडावर धारधार हत्याराने वार करून जीवे मारले. त्यानंतर, तिला तलावात टाकून दिल्याची फिर्यादी खंडेशा सिद्धाराम देशेट्टी (वय २१) मयताच्या मुलाने दिला आहे. या प्रकरणात आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.