सोलापूर : आमच्यावर केलेली केस मागे घे अशी दमदाटी करीत पाचजणांनी मिळून महिलेवर कोयत्यानं वार करुन जखमी केले. यात दीड वर्षाच्या बाळाच्या डोक्यालाही जखम झाली. मुळेगाव (ता. द. सोलापूर) येथे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास जखमीच्या घरासमोर ही घटना घडली.
पुनम श्याम काळे (वय- ३२), श्याम शिंदे (वय- दीड वर्षे, रा. मुळेगाव) असे जखमींची नावे आहेत. यातील जखमी पुनम काळे हिस सर्जेराव राजाराम काळे व शोभा विलास शिंदे यांच्यासह तिघांनी मिळून आमच्यावर केलेली केस मागे घे म्हणून कोयत्यानं वार केला. लाथाबुक्क्याने मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले. महिलेच्या डोक्याला, उजव्या हाताला, छातीस मुका मार लागला. दीड वर्षाच्या बाळाच्या डोक्यास जखम झाली आहे, असे सिव्हील चौकीतील एमएलसी रजिस्टरमध्ये नोंद आहे. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.