शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

तेलगावात महिलेची विवस्त्र धिंड; सरपंच, दोन महिलांसह नऊ आरोपींना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 4:10 PM

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय; दोन लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा

ठळक मुद्देमहाराष्ट्रात खळबळ उडालेल्या या घटनेनंतर अमेरिका व इंग्लंड या देशातही निदर्शने झाली होतीया प्रकरणी दिल्ली येथे लोकसभेच्या संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होतादेशात मरेपर्यंत पोलीस संरक्षण फुलनदेवी यांना देण्यात आले होते

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव (सीना) येथे मागासवर्गीय महिलेची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी सरपंचासह नऊ जणांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची व दोन लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

बाळासाहेब सिद्राम माने (वय ५५), शिवाजी लक्ष्मण पाटील (वय ४९), बिभीषण लक्ष्मण पाटील (वय ४७), अरुण बंडा जाधव (वय ३५), कमलाकर शामराव पाटील (वय ४०), नितीन कोंडिबा पाटील (वय ३०), गणपत नामदेव जाधव (वय ४३), पार्वती ऊर्फ पारूबाई बाळू पाटील (वय ३०), सुबाबाई ऊर्फ सुभद्रा दिगंबर घाटे (वय ५५, सर्व रा. तेलगाव, ता. उत्तर सोलापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. खटल्याची हकिकत अशी की, गावामध्ये मद्यविक्री व इतर अवैध धंद्यांबाबत पोलिसात पीडित महिलेने तक्रार  दिल्याचा संशय होता.

या कारणावरून आरोपींनी महिलेला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. दि. ११ मार्च २००६ रोजी सकाळी ९ वाजता महिला व मुलासह तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी जात होते. तेव्हा तेलगाव एसटी स्टॅन्डवर सर्व आरोपींनी महिलेची अडवणूक केली. महिलेला विवस्त्र करून मारहाण करीत गावच्या चावडीपर्यंत धिंड काढली होती. मारहाणीनंतर घराला जाळून टाकण्याची धमकी दिली होती. 

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायदा व मारहाणीचा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. गंगाधर रामपुरे यांनी युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी नऊ आरोपींना दोषी धरून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कलम ३(१)(३), ३ (१)(११) व भादंवि कलम ५०६ (२) अन्वये प्रत्येकी पाच वर्षांची सक्तमजुरी व दोन लाख ४३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. गंगाधर रामपुरे तर मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. संजीव सदाफुले व अ‍ॅड. सिद्धांत सदाफुले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक पी. पी. गायकवाड यांनी काम पाहिले. 

धिंडप्रकरणी महाराष्ट्रात झाले होते १२०० आंदोलने

  • - मागासवर्गीय महिलेच्या विवस्त्र धिंडप्रकरणी २००६ साली महाराष्ट्रात मोठे आंदोलन झाले होते. प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर सुमारे १२०० आंदोलने झाली होती. महाराष्ट्रात खळबळ उडालेल्या या घटनेनंतर अमेरिका व इंग्लंड या देशातही निदर्शने झाली होती. या प्रकरणी दिल्ली येथे लोकसभेच्या संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तत्कालीन लोकसभेच्या महिला सभापती मीरा कुमार यांनी मागासवर्गीय महिलेस मरेपर्यंत पोलीस संरक्षण दिले होते. देशात मरेपर्यंत पोलीस संरक्षण फुलनदेवी यांना देण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रातील या महिलेस मरेपर्यंत पोलीस संरक्षण आहे. 
  • - शिक्षा जाहीर होताच तेलगावात पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या. पीडित महिलेच्या घराचे संरक्षण व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्त लावला आहे. २००६ साली झालेल्या या घटनेच्या वेळी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील हे कार्यरत होते. तब्बल १४ वर्षांनंतर लागलेल्या निकालाच्या वेळी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक असलेले मनोज पाटील हे सध्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

मागासवर्गीय पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहोत. तत्काळ तिला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आपण करणार आहोत. - अ‍ॅड. संजीव सदाफुले 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय