सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात महिला असुरक्षित, सुशिलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:20 PM2018-04-17T13:20:30+5:302018-04-17T13:20:30+5:30

सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे उन्नान व कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाºयाच्या निषेधार्थ चार हुतात्मा पुतळा येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला.

Women are insecure in the country, Sushilkumar Shinde | सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात महिला असुरक्षित, सुशिलकुमार शिंदे

सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशात महिला असुरक्षित, सुशिलकुमार शिंदे

Next
ठळक मुद्देविकृत मानसिकतेच्या विरोधात हा मोर्चा : प्रणिती शिंदेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप

सोलापूर : भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील महिला असुरक्षित असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी येथे बोलताना केली. 

सोलापूर शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे उन्नान व कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाºयाच्या निषेधार्थ चार हुतात्मा पुतळा येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, बाबा मिस्त्री, विनोद भोसले, युवक अध्यक्ष सुदीप चाकोते, अंबादास करगुळे, माजी महापौर सुशीला आबुटे, अलका राठोड, नलिनी चंदेले, शहर महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, जिल्हा अध्यक्षा इंदुमती अलगोंड-पाटील, सुमन जाधव, अ‍ॅड. करिमुन्निसा बागवान, शर्मिला देशमुख, अरुणा वर्मा, मैनुद्दीन शेख, उमा पार्सेकर, रतन डोळसे, राहुल वर्धा आदी सहभागी झाले होते.

कॅन्डल मार्चमध्ये महिला, तरुणी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही गर्दी पाहता लोकांच्या मनात दाटलेला आक्रोश बाहेर येत असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी सांगितले. देशात असुरक्षिततेचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पण गुन्हेगाराला शासन करण्यास सरकार असमर्थ ठरत आहे. शेवटी न्यायालयाला याची दखल घ्यावी लागते. ही कसली लोकशाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या विरोधात कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. 

‘महिलांना बळ द्या’
- आमदार प्रणिती शिंदे यांनी विकृत मानसिकतेच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे स्पष्ट केले. कायदे कितीही कठोर असले तरी महिलांना बळ द्यायचे असेल तर मानसिकतेत बदल घडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला. 

Web Title: Women are insecure in the country, Sushilkumar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.