सांगोला येथील माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानने महूद-चव्हाणवाडी (ता. सांगोला) येथील श्री समर्थ महिला स्वयंसहायत बचत गटास गांडूळ खत प्रकल्प उभारून दिला आहे. डॉ. केतकी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ महिला बचत गट सुरू आहे. या महिला बचत गटातील सर्व महिला सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. प्रतिष्ठानतर्फे यशराज गांडूळ खतप्रकल्पाचे उद्योजक सुरेश पवार यांनी बचत गटातील महिला शेतकऱ्यांना गांडूळ खतप्रकल्पाबद्दल मार्गदर्शन केले.
श्री समर्थ बचत गटाच्या प्रमुख कल्पना चव्हाण या सात एकर शेतीसाठी गांडूळ खतप्रकल्प उभारत आहेत. परिसरातील इतर महिला शेतकऱ्यांकडून खतप्रकल्पाच्या बेडची मागणी होत आहे. यावेळी प्रतिष्ठानच्या माधवी देशपांडे यांच्यासह गटातील महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक मीरा कोळेकर यांनी केले.
फोटो ओळ :::::::::::::
गांडूळ खतप्रकल्प उभारणीबाबत माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे मार्गदर्शन करताना सुरेश पवार.