उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार कल्याणशेट्टी यांनी राजकारणातील पारंपरिक विरोधक भरमशेट्टी गटाबरोबर चर्चा करून समझौता केला. शेवटच्या क्षणी बाळशंकर काही जागा लढवत रिंगणात उतरले. यामुळे ७ जागांसाठी निवडणूक लागली. त्यामध्ये कल्याणशेट्टी- भरमशेट्टी यांनी सर्व उमेदवार निवडून आणले. सागर कल्याणशेट्टी, सोनाली तळवार, मुक्ताबाई ढगे, शैलेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली, तर गौरबाई भरमशेट्टी, काशाप्पा पुजारी, शांताबाई फसगे, श्रीकांत बकरे, जयश्री भरमशेट्टी, गौतम बाळशंकर, नीता सोनकांबळे भरघोस मताने निवडून आले.
चप्पळगाव हे गाव नेहमी राजकीयदृष्ट्या वादग्रस्त गाव. या ठिकाणी बेहिशेबी पुढारी मात्र कोण कधी कोणाला दणका देतील याचा नेम नाही. या गावात यंदा बाजार समिती उपसभापती आप्पासाहेब पाटील, उमेश पाटील, बसवराज बानेगाव, सिद्धाराम भंडारकवटे, रियाज पटेल यांनी स्थानिक गट तयार करून निर्विवाद यश संपादन केले. त्यामधून सुवर्णा कोळी, सिद्धाराम भंडारकवटे, अपर्णा बानेगाव, वंदना कांबळे, रेश्मा तांबोळी, उमेश पाटील, स्वामीराव जाधव, चित्रकला कांबळे, श्रीकांत गजधाने, गंगाबाई वाले, तर धनश्री वाले, गौराबाई अचलेरे, मल्लिनाथ सोनार यांनी यश मिळविले.
मोटयाळ ग्रामपंचायतमध्ये यंदा चौथ्यांदा विजयी होण्यास युवक नेते कार्तिक पाटील, पठाण गटाला यश आले आहे. गोरगरिबांसाठी त्यांनी आजवर सत्तेच्या माध्यमातून केलेले काम त्यांना तारले आहे. आणि स्वतः पाटील, सोनाली सुरवसे, हालीमा फुलारी, विजय गेजगे अशा चार जणांना संधी मिळाली. तर विरोधक अप्पाराव साळुंखे गटानेही संघर्ष आजही सुरू ठेवले असून, त्यांनाही यंदा स्वतः साळुंखे, संगीता सपकाळ, निर्मला सुतार अशा तीन जागा मिळाल्या.
चप्पळगाव वाडीत दोड्याळे, पारशेट्टी, नदाफ,बंने गटाला अतिआत्मविश्वास नडला. आणि विरोधी गटाचे अंकलगी, गोविंदे, दोड्याळे,नदाफ, पारशेट्टी, बन्ने गटाने सर्व जागा जिंकून बाजी मारली. लक्ष्मीबाई अंकलगे, पंडित दोड्याळे, निर्मला पारशेट्टी, ललिता बंने, जावेद नदाफ, उज्वला गोविंदे, श्रीमती नदाफ हे उमेदवार निवडून आले.
चुंगीत सत्ताधारी आशाराणी गड्डे यांचे भ्रष्टाचार मुद्द्यावरून प्रकरण गाजले. यामुळे त्यांची प्रतिमा खराब होऊन दहा वर्षे गावावर असलेली सत्ता गमवावी लागली. पूर्वीच्या सत्ताधारी माने, पाटील गटाला चांगले यश मिळाले. शांताबाई चव्हाण, रत्नमाला चव्हाण, सारिका चव्हाण, महादेव माने, ज्योती लोहार, वृषाली माने, रुक्मिणी साळुंखे, जनाबाई थोरे, रुक्मिणी राठोड यांनी विजयाची सलामी दिली.
----एक मताच्या फरकाने विजयी---
चप्पळगाव येथे रवी शिरगुरे यांचा स्वामीराव जाधव यांनी पराभव केला, तर चप्पळगाव वाडी येथे सुरेखा पारशेट्टी यांच्यावर निर्मला पारशेट्टी यांनी मात केली. अशा दोन्ही ठिकाणी केवळ एक मताच्या फरकाने बाजी मारली आहे. पाचही गावांत मिळून ४७ सदस्यसंख्या आहे. तब्बल ३१ ठिकाणी महिलांना ग्रामपंचायतमध्ये संधी मिळाली आहे.
----
फोटोओळी
हन्नूर येथे आमदार कल्याणशेट्टी व भरमशेट्टी गटाने एकतर्फी बाजी मारल्यानंतर जल्लोष करताना सदस्य.