सोलापूरची पर्यटन वैशिष्ट्ये असा या दोन्ही स्पर्धांचा विषय होता. निबंध स्पर्धेत वैष्णवी अण्णासाहेब गरड, सुरेखा महादेव केवटे, आनंदी गजानन काळे, श्वेता रावसाहेब पालकर, पूजा दिलीप पाटील, दीपाली गुरुनाथ बोराळे विजेत्या ठरल्या आहेत. छायाचित्र स्पर्धेत प्रवीण गायकवाड, राहुल गोडसे, अमोल मिस्कीन, महेश बनसोडे, निशांत वाडकर, शुभम राजमाने विजेते ठरले आहेत, अशी माहिती मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी दिली.
हा पुरस्कार वितरण समारंभ सोलापूर सोशल फाउंडेशनचे ब्रँड ॲम्बेसिडर राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संचालक मयुरी वाघमारे-शिवगुंडे, रवींद्र मिनीयार, सल्लागार प्रा. नरेंद्र काटीकर, अमित जैन, संकेत जेसुदास हे उपस्थित होते. या दोन्ही स्पर्धांचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. नरेंद्र काटीकर यांनी काम पाहिले. परीक्षक म्हणून बदिउजम्मा बिराजदार, प्रा. प्रशांत चाबुकस्वार आणि प्रा. गणेश देशपांडे यांनी काम पाहिले. छायाचित्र स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवानंद हिरेमठ यांनी काम पाहिले.
----