शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

माझ्या स्पीडने काम करा...अन्यथा...

By admin | Published: June 13, 2014 12:46 AM

जि.प. खातेप्रमुखांची बैठक; चंद्रकांत गुडेवार यांनी भरला दम

सोलापूर : माझ्या स्पीडने काम करा, भ्रष्टाचार चालणार नाही, दप्तर दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई केली जाईल, फिल्डवर जाऊन तपासण्या करा अशा सूचना दिल्या आहेत जि.प.चे सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी.सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार घेतल्यानंतर रात्री ९ वाजता त्यांनी खातेप्रमुखांची बैठक घेतली. ही बैठक रात्री साडेदहा वाजेपर्यंत चालली. प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी प्रभू जाधव वगळता अन्य सर्वच खातेप्रमुख या बैठकीला होते. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहीतच आहे. कामाचे स्पीड माझ्या कामाप्रमाणे ठेवा, दप्तर दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई केली जाईल असे गुडेवार म्हणाले. एक-दोन वेतनवाढ ही कारवाई नाही तर गंभीर स्वरुपाची कारवाई माझ्याकडून होईल असे काम करु नका असेही त्यांची सांगितले. गैरप्रकार करु नका, पैशासाठी फाईल थांबल्याचे निदर्शनाला आले तर जागेवरच कारवाई केली जाईल, प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. खात्याच्या खालपासून खातेप्रमुखापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर गावकऱ्यांना माहीत असले पाहिजेत. मुख्यालयात ज्या दिवशी असाल त्यादिवशी फाईल झटपट निकाली काढा. केवळ कार्यालयात न थांबता फिल्डवर तपासण्या करा, असे त्यांनी सांगितले. --------------------आत काम करावे लागणारअनेक खातेप्रमुख मुख्यालय सोडत नाहीत. फिरत्याही करीत नाहीत. कार्यालयात बसून फायलीही काढत नाहीत. गुडेवार यांनी कामाचा वेग वाढवा अन्यथा सोडणार नाही, असा दम भरल्याने अधिकाऱ्यांना कामाला लागावे लागणार आहे. शाळा, दवाखाने आता सुरू ठेवावे लागणार आहे. मुख्यालयातील ओस कार्यालये आता भरलेली दिसतील.