सोलापूर: पुण्याच्या धर्तीवर आता सोलापूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग येणार आहेग़ेल्या वर्षभरापासून सुरू असलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम मंजूर झालेल्या कोस्टल श्रेयी या कोलकात्याच्या कंपनीला कार्यारंभ आदेश (वर्कआॅर्डर) ३ जून रोजी दिला असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक बी़बी़ इखे यांनी ‘लोकमत’ ला दिली़ ९२३ कोटींचे हे काम आहे़सोलापूर ते हैदराबाद हा महामार्ग चौपदरीकरण होणार आहे़ सर्व निविदा प्रक्रिया पार पडल्यामुळे, सर्व मंजुरी मिळाल्यामुळे कोस्टल श्रेयी या कंपनीला काम सुरू करावे असे पत्र दिले असल्याचे इखे यांनी सांगितले़ येत्या अडीच वर्षात हे काम पूर्ण होणे करारपत्रानुसार बंधनकारक आहे़ त्यामुळे लवकरच हैदराबादचा प्रवास देखील पुण्याप्रमाणे सुपरफास्ट होणार आहे़ बोरामणी ते हत्तूर या बायपाससाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे इखे म्हणाले़सोलापूर-येडशीचे १०० किलोमीटर लांबीचे आणि ९७४ कोटींचे हे काम आयआरबी या कंपनीला मिळाले आहे़ या कामासाठी देखील भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे़ जुलैअखेर ८० टक्के भूसंपादन होईल त्यानंतर त्या कंपनीला काम सुरू करण्याचा आदेश दिला जाणार आहे़ सोलापूर ते विजापूर हे काम सद्गुरु इंजिनिअरिंग यांना मंजूर झाले होते; मात्र पर्यावरणविषयक मंजुरी वेळेत न मिळाल्यामुळे त्या कंपनीने मक्ता रद्द केला होता़ नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली असून जुलैअखेर पहिली निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर अंतिम निविदा प्रसिद्ध करून मक्ता मंजूर केला जाईल़ येत्या सहा महिन्यात या सर्व प्रमुख महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होईल असा विश्वास इखे यांनी व्यक्त केला़-------------------------------------विकासाचे महामार्ग...सोलापूर-पुणे महामार्गाचे ८० टक्के काम पूर्णसोलापूर-हैदराबाद रस्त्याचे काम लवकरच सुरू होणारसोलापूर- विजापूर जुलैमध्ये निविदा प्रक्रिया होणार सोलापूर-येडशी ९७४ कोटींचे काम मक्ता आयआरबीलाहत्तूर-बोरामणी बायपासचा प्रस्ताव पाठविणाऱ--------------------------वेटिंगवर...!सोलापूर ते विजापूर हा महामार्ग देखील चौपदरीकरण करण्यात येणार आहे़ यामध्ये कोंडी ते हत्तूर या २२ किमीच्या बायपासचा समावेश आहे़ गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरण विषयक मंजुरी न मिळाल्यामुळे माळढोक परिक्षेत्राशेजारुन जाणारा हा बायपास रखडला होता़ राज्य शासनाने मंजुरी दिली असून केंद्राच्या ‘सीझेडए’कडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे़ कामाची पहिली निविदा प्रक्रिया जुलैअखेर पूर्ण होईल़ या कामाचे देखील सध्या ८० टक्के भूसंपादन झाले आहे़येत्या सहा महिन्यांत हे काम सुरू होईल, असे भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे म्हणणे आहे़ ----------------------------------बीओटी तत्त्वावर सोलापूर-हैदराबाद या १०० किमी लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कोस्टल श्रेयी कंपनीला दिले आहे़ ३ जून रोजी काम सुरू करण्याचा आदेश दिला आहे़ या कामासाठीचे ८० टक्के भूसंपादन झाले असून त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे ८० कोटी रुपये नुकसानभरपाई दिली आहे़- बी़बी़ इखेप्रकल्प संचालकभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
९२३ कोटींची दिली ‘वर्कआॅर्डर’
By admin | Published: June 07, 2014 1:00 AM