आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : विडी कामगारांच्या पाल्यांसाठी शासनाच्या अनेक विधायक योजना आहेत. त्याचा लाभ गोदूताई परुळेकर वसाहतीच्या रहिवाशांनी घ्यावा. आरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने कामगार कल्याण मंडळातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन श्रम कल्याण संघटनचे कल्याण एवं उपकर आयुक्त (नागपूर) वसंत सावंत (नागपूर) यांनी आज सोलापुरात दिली. कुंभारी (ता. द. सोलापूर) येथील गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीला नागपूरचे वेल्फेअर आयुक्त व्ही. एम. सावंत यांनी गुरुवारी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत स्वीय सहायक संजय गर्ग यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा माजी नगरसेविका सुनंदाताई बल्ला होत्या. व्यासपीठावर फातिमा बेग, अमोल मेहता, गजेंद्र दंडी, नागमणी दंडगल, अरिफा शेख, विल्यम ससाणे, वासीम मुल्ला आदी उपस्थित होते. या भेटीत सावंत यांनी वसाहतीला भेट देऊन समाधान व्यक्त केले. कामगारांच्या पाल्यांना महाराष्ट्र शासन कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार व नोकरीसाठी लागणारे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षितांना नोकरी व रोजगारासाठी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले.प्रारंभी संस्थेचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम मास्तर यांनी लेखाजोखा मांडला. ही वसाहत विडी कामगारांची असून, यासाठी फार मोठी चळवळ उभी करावी लागली. शहरापासून १० किमी अंतरावर येऊन वास्तव्य करताना सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. आज या वसाहतीला १२ वर्षे पूर्ण झाली तरी प्रामुख्याने अंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाईन, पाणी या समस्या गंभीर आहेत़ या वसाहतीतील लोकांसाठी किमान २५ बेडच्या हॉस्पिटलची गरज आहे. वसाहतीतील लाभार्थ्यांचे पाल्य मेहनती, सुशिक्षित आहेत. परंतु त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे नोकरी वा रोजगार मिळत नाही. त्यांना आपल्या खात्याच्या माध्यमातून योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी विनंतीही आडम मास्तरांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम कलबुर्गी, आप्पाशा चांगले, श्रीनिवास गड्डम, मोहन कोक्कूल, राजेंद्र गेंट्याल, मधुकर चिल्लाळ, योगेश अकिम, अतिक दंडोती, नागेश जल्ला, देवपुत्र सायबोळू, महिबूब मणियार, इमाम शेख, हनमंतू पेद्दी, सावदप्पा पेद्दी, दिनेश बडगू, गिरीराज कलशेट्टी, अफसर शेख, रहीम शेख, प्रभाकर गेंट्याल, विजय साबळे, आसिफ पठाण, मल्लिकार्जुन बेलियार, बालाजी गुंडे, अंबादास बिंगी, आबाजी दोंतुल, दीपक म्हंता यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल वासम यांनी तर आभार शकुंतला पाणीभाते यांनी मानले.-------------------कामगारांसाठी मोफत औषधोपचारासाठी प्रयत्नविडी कामगार जीवघेण्या उद्योगात काम करीत असून त्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या हृदयरोग (एक लाख 30 हजार), कॅन्सर (अमर्याद) तसेच किडनी (दोन लाख) आदी विकारांवरील उपचारासाठी अनुदान मिळते. त्यासाठी सोलापुरातील सुपर स्पेशालिटी मल्टी हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या प्रशिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न करु, उपकर आयुक्तांकडून सोलापूरातील गोदूताई विडी घरकूल प्रकल्पाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:52 AM
आरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने कामगार कल्याण मंडळातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन श्रम कल्याण संघटनचे कल्याण एवं उपकर आयुक्त (नागपूर) वसंत सावंत (नागपूर) यांनी आज सोलापुरात दिली.
ठळक मुद्देविडी कामगारांच्या पाल्यांसाठी शासनाच्या अनेक विधायक योजना आरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या दृष्टीने कामगार कल्याण मंडळातर्फे प्रयत्नकामगारांच्या पाल्यांना महाराष्ट्र शासन कौशल्य विकास कार्यक्रमरोजगार व नोकरीसाठी लागणारे मोफत प्रशिक्षण वसाहतीतील लोकांसाठी किमान २५ बेडच्या हॉस्पिटलची गरज