यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शेतकरी, सभासद, वाहतूकदार, कर्मचारी व कामगार यांच्या बळावर व कारखान्यावर सर्वांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या बळावर यंदाच्या गळीत हंगामात कारखाना विक्रमी गाळप करेल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, शेती अधिकारी एम. आय. देशमुख, के. डी. वैद्य, रावसाहेब अवताडे, संजय खुडे, मोहन चव्हाण, राजशेखर गायकवाड, विठ्ठल भोसले, नेताजी बोडके आदींसह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
----
---
मागील वर्षीच्या चांगल्या पावसाने कारखाना क्षेत्रात उसाची लागवड वाढली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दहा लाख टन उसाची नोंद कारखान्याकडे केली आहे. वाहनांचे व इतर करार सुरू आहेत.
- विक्रांत पाटील, अध्यक्ष, लोकनेते शुगर, अ.नगर
--
फोटो : ०२ लोकनेते
लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी सतीश भोसले, चेअरमन विक्रांत पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे.
---