सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी केलेल्या आवाहनाला दत्त चौक व्यापारी मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कोविड अँटीजेन तपासणी शिबिरात १५० व्यापारी निगेटिव्ह आढळून आले.
दरम्यान, चंदुभाई देढीया व संदेश कोठारी, धिरेंन पिसे यांच्या प्रयत्नाने व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. महानगरपालिकेचे उपायुक्त व कोविड संपर्क कार्यालयाचे प्रमुख धनराज पांडे, डॉ. मंजरी कुलकर्णी, डॉ. सायली शेंडगे, उद्योग वर्धिनीच्या चंद्रिकाबेन चव्हाण आदीचे सहकार्य लाभले.
या कोरोना तपासणी शिबिराचे उदघाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे केतनभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले सर्व व्यापारी व आठवडे बाजार व्यापाऱ्यांनी व कामगारांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून आपले ग्राहक, कुटुंबियांना व दुकानातील इतर लोकांना कोरोना लागण होणार नाही. शहरातील व्यापाऱ्यांना काही मदत लागल्यास मी स्वतः मदत करायला तयार असल्याचेही शहा यांनी सांगितले.