शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

शाडूचे गणपती घरोघरी; चेहºयावरच्या सुरकुत्या सांगतात शाडूतला ७५ वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 12:31 PM

 ‘लोकमत’इनिशिएटिव्ह; आजपर्यंत बनविल्या लाखो मूर्ती; कमाईपेक्षा भक्तांचे समाधानच महत्त्वाचे

सोलापूर : गणेशोत्सवानिमित्त घरांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाºया गणेशमूर्ती पर्यावरणपूरकच असल्या पाहिजेत, हा ध्यास घेऊन ८८ वर्षीय धोंडिबा नारायण चव्हाण हे मूर्तिकार वयाच्या बाराव्या वर्षापासून ‘श्री’ मूर्ती घडविण्याची कला जोपासत आहेत. शाडूच्या गोळ्यावर त्यांचे लिलया फिरणारे हात अन् बोटं थक्क करणारे आहेत. 

यंदा ते आपल्या कलेचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. धोंडिबा चव्हाण यांनीे वयाच्या बाराव्या वर्षापासून शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली. घरचा परंपरागत व्यवसाय होता; पण वडील मातीला हात लावू देत नसत. शेजारी आणि गल्लीतल्या लोकांच्या घरी बसून गुपचूपपणे धोंडिबा हे गणेशमूर्ती बनवीत असत. १९५२ साली त्यांनी बनविलेल्या शाडूच्या मूर्तीची कलाकुसर पाहून पाच आणे किमतीची मूर्ती सात रुपयांना विकली गेली. त्यानंतर मात्र वडिलांना मुलाची कलेवरील हुकूमत लक्षात आली अन् वडिलांकडून मूर्तिकार होण्यास रीतसर परवानगी मिळाली.

वयाच्या बाराव्या वर्षी जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या धोंडिबा यांनी पीओपीच्या जमान्यातही आपल्या शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्याची कला अखंडपणे जोपासत आजतागायत ते कार्यरत आहेत. पूर्वी शहरातील माणिक चौक परिसरात राहणारे हे मूर्तिकार सध्या शेळगीत लहानशा जागेत एकटेच शाडूच्या मूर्ती बनवीत असतात. धोंडिबांचे ग्राहकही शहरातील नामवंत घराण्यातील असून, ते मागील साठ ते सत्तर वर्षांपासून दरवर्षी त्यांच्याकडूनच शाडूची गणेशमूर्ती खरेदी करतात. एक आणि दोन फूट उंचीच्या गणेशमूर्ती ते तयार करतात. त्यासाठी नैसर्गिक पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करतात.

जगण्यातला आनंद मिळतो !प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी चालू असलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची मागील पंचाहत्तर वर्षांची एकेरी चळवळ आजही चालू असून जोपर्यंत तब्येत साथ देईल तोपर्यंत होईल तेवढ्या प्रमाणात शाडूच्या मूर्ती बनविण्याचे काम करणार आहे. त्यातील कमाईपेक्षा भक्तांचे समाधान हेच मला जगण्यातला आनंद देऊन जाते, असे मूर्तिकार धोंडिबा चव्हाण यांनी सांगितले.