सोलापूर : बुधवारी सोलापूरमधील साहित्यिक मंडळीनी साखळी उपोषणस्थळी जाऊन पाठींबा दिला आहे. आजपर्यंत अनेक चळवळी क्रांती, त्यामध्ये साहित्यिकांनी योगदान दिले आहे. यामुळे मराठा आरक्षणाची चळवळ यशस्वी करण्यासाठी साहित्यिकांनीही बळ द्यावे. आपल्या लेखणीतून मराठा समाजाचे दुःख, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा साहित्यातून मांडावी, अशी अपेक्षा यावेळी डॉ. शिवाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सुवर्ण गरड, राजेंद्र भोसले यांनी कविता सादर केल्या.
अरविंद मोटे यांनी आरक्षणच्या लढ्यासाठी लेखक कवीने आपल्या लेखण्या झिजवाव्यात असे आवाहन केले. सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार व राजन जाधव यांनी कवी व साहित्यिकांचे आभार मानले. यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले, साहित्यिक राजेंद्र भोसले, डॉ. दत्ता घोलप, कवी रामप्रभू माने, कवी फुलचंद नागटिळक, रामदास नागटिळक, प्रा. डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण, डॉ. अनंत वडघणे, कुंडलिक मोरे, अरविंद मोटे आदी उपस्थित होते.