पंढरपूर : परवाना नसताना देखील पंढरपुरातील दोन डॉक्टर रुग्णांवर औषधोपचार करतात. त्यांच्या अघोरी उपचारामुळे माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे, अशी तक्रार डॉ. महेश काळे व डॉ. दिपक लोखंडे (रा. सांगोला रोड, एमएसईबीच्या पाठीमागे, पंढरपूर) यांच्याविरुध्द विकास पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी हरीशचंद्र पवार (रा. शिरजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला नातेवाईकांच्या सांगण्यावरुन दारुचे व्यसन सोडवण्यासाठी पंढरपूरमधील खाजगी डॉ. महेश काळे व डॉ. दिपक लोखंडे यांच्याकडे १८ डिसेंबर २०१८ घेवून आले हाते. तेव्हा डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांनी एका पेशंटला १ हजार ३०० रुपये सांगितले. तसेच पोट साफ करण्यासाठी ५ हजार रुपये सांगितले. ती फी नाव नोंदणी करणारे रमेश भिमराव काळे यांच्याकडे जमा केली. त्यांनतर वाल्मिकीवर औधोपचार करण्यात आले. थोड्याच वेळात वाल्मिकीला जुलाब उलट्या सुरु झाल्या.
याबाबत दोन्ही डॉक्टरांना नातेवाईकांनी माहिती सांगितली. मात्र डॉक्टारांनी काही होणार नाही. रुग्णाला घेऊन जा असे सांगितले. वाल्मिकी यास पंढरपूरहून टेंभुर्णीमार्गे औरंगाबादला घेऊन जात होते. यावेळी करकंब येथे दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी बोलायचा बंद झाला. थोड्या वेळाने त्याचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. काळे व डॉ. लोखंडे यांना फोनवरुन सांगितले. त्यावेळी त्यांनी रुग्णाला घरी घेऊन जावा असे सांगितले. वाल्मिकीच्या मृतदेहाचे गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे पोस्टमॉर्टेम केले. तसेच गंगापूर येथे मयत दाखल करण्यात आले. तो गुन्हा पंढरपूर शहरकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीसांनी मयत निकाली काढले होते. परंतू आमचे समाधान न झाल्याने अवैध प्रॅक्टीस करणाºया दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करावी अशी तक्रार वाल्मिकी पवारचे बंधू विकास पवार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस उप. निरिक्षक दशरथ वाघमोडे करीत आहेत.-----------छातीवर बसून केला उपचारवाल्मिकीला या रुग्णाला डॉ. काळे याने व डॉ. लोखंडे यांनी प्रथम पातळ औषध प्यायला दिले. त्यानंतर वाल्मिकी याचे दोन्ही हात कापडाने बांधून त्यास जमिनीवर उताने झोपवून पायावर डॉ. लोखंडे बसले. व डॉ. काळे वाल्मिकीच्या छातीवर बसून त्याच्या नाकामध्ये औषधाचे थेंब सोडले. असल्याचा उल्लेख विकास पवार यांनी तक्रारीत केला आहे.