सरपंच व उपसरपंच पदासाठीप्रत्येकी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध जाहीर केली. त्यांना ग्रामसेवक तात्यासाहेब नाईकनवरे, तलाठी चंद्रकांत मोटे, नरखेड बीटचे पोलीस हेडकाॅन्स्टेबल गणेश पोफळे यांचे सहकार्य केले. नरखेडचे सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आरक्षित झाले होते. झेडपी सदस्य उमेश पाटील, संतोष पाटील, प्रमोद गरड यांच्या श्री सिध्देश्वर ग्रामविकास पॅनलने सर्वपक्षीय श्री सिध्देश्वर ग्रामविकास आघाडीचा १३ पैकी १२ जागा जिंकून पराभव केला. ग्रामपंचायतीच्या निवडणूक लागलेल्या ११ पैकी १० जागा आणि बिनविरोध झालेल्या २ जागा अशा एकूण १३ जागेपैकी १२ जागा जिंकून पुन्हा नरखेड ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली. निवडीनंतर सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जि. प. सदस्य उमेश पाटील, संतोष पाटील, प्रमोद गरड, जयवंत पाटील, प्रदीप पाटील, डॉ. सुरेश मोटे, अशोक धोत्रे, धर्मराज जाधव, लक्ष्मण राऊत, अशोक मोटे, सिध्देश्वर मोटे, पांडुरंग राऊत,रमेश मोटे, विनोद पाटील, उत्तम मोटे, गणपत गरड , भाऊसाहेब पाटील, सुनील भडंगे,विजय मोटे,अरूण यादव, ज्ञानेश्वर ताकमोगे, गणेश मोटे, राहुल कसबे, दाजी रणपिसे ग्रामस्थ उपस्थित होते .
फोटो
२३नरखेड-यशवंत मोटे
२३ नरखेड-सूवर्णा जाधव