कंपनीच्या वितरकासाठी सन २०२० मध्ये कंपनीने मोटिवेशन स्कीम राबविलेली होती. या योजनेत जे वितरक उद्दिष्टपूर्ती करतील त्यांच्यासाठी हिरो कंपनीची टू व्हीलर देण्याची प्रोत्साहनपर योजना राबविली होती. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील वितरकांना कंपनीच्या क्लब एक्सेलसियर या कार्यक्रमांतर्गत पंधरा वितरकांना कोठारी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर उज्ज्वल कोठारी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
कोठारी ग्रुपच्या कोठारी ॲग्रीटेक प्रा. लि. या इरिगेशन डिव्हिजनच्या वतीने सूर्या हॉटेल, सोलापूर येथे वितरकांसाठी टेक्नोकमर्शियल ट्रेनिंग व क्लब एक्सेलसियर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोठारी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर उज्ज्वल कोठारी, डायरेक्टर आशिष कोठारी, मार्केटिंग डायरेक्टर पुष्कराज कोठारी, सीईओ, बिझनेस डेव्हलपमेंट अँड मार्केटिंगचे बी.पी. चव्हाण, असिस्टंट जनरल मॅनेजर संदीप देशपांडे उपस्थित होते.
यावेळी आशिष कोठारी यांनी कंपनीने मार्केटमध्ये शेतकऱ्यांची गरज ओळखून सर्वप्रथम थीनवाल ड्रीपलाइन,इकोस्प्रिंकलर मार्केटमध्ये आणले व शेतकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच नवीन प्रॉडक्ट फाईव्ह लेयर स्प्रे पाईप लवकरच मार्केटमध्ये आणणार असल्याचे सांगितले.
----
शेती उद्योगाला तंत्रज्ञान उपयोगी
कोविड महामारीमुळे शेती उद्योग व शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी योग्य तंत्रज्ञानच उपयोगी पडणार आहे. ड्रीप इरिगेशनद्वारे पाण्यावर नियंत्रण म्हणजे मजूर, पाणी, वीज, खत, औषध व पैशात बचत करता येते. (वा. प्र.)
----
फोटो : १० मोहोळ
वितरकांना कोठारी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर उज्ज्वल कोठारी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.