यंदा बाप्पासाठी आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून आले नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 05:26 AM2018-09-10T05:26:46+5:302018-09-10T05:27:11+5:30
यंदा बाप्पासाठी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूहून नारळाची आवक झाली आहे.
Next
सोलापूर : यंदा बाप्पासाठी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूहून नारळाची आवक झाली आहे़ सोलापूरच्या बाजारपेठेत दररोज चार ट्रक नारळांची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़
तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पूजेच्या साहित्याची वानवा जाणवण्याची स्थिती आहे. दूर्वा, आघाड्यासह फळांचे प्रमाण कमी आहे़ तसेच साहित्याचेही दर जीएसटी आणि इतर कारणांनी १० टक्के वाढलेले आहे़ केरळच्या पूरस्थितीनेही त्यात भर घातली आहे़ त्यामुळे आंध्र, तामिळनाडूतून नारळाची आवक येत आहे. त्याचप्रमाणे सध्या झेंडूचा दर दहा रुपयांपासून वीस रुपये किलो आहे़