शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

होय.. माझी आठ एकर शेती मागत होती म्हणून मीच तोंड दाबून रेश्माचा खून केला : तौफिक शेख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:30 PM

कर्नाटक पोलिसांसमोर दिली कबुली : पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांनी दिली माहिती 

ठळक मुद्देसोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होतागुन्हा दाखल झाल्यानंतर तो मिटवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती ऐकत नव्हती

सोलापूर : रेश्मा पडेकनूर हिच्या सोबत माझे प्रेम संबंध होते, सोलापूर-विजापूर रोडवरील माझ्या मालकीची आठ एकर जमीन ती तिच्या नावे कर व पैसे दे अशी मागणी करीत होती. तिच्यात आणि माझ्यात झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग तिने व्हायरल करून मला ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे मी तिचा खून केला अशी कबुली एमआयएमचे शहराध्यक्ष व नगरसेवक तौफिक शेख यांनी दिल्याची माहिती विजयपूरचे पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रेश्मा सोबत माझे प्रेमसंबंध होते, तौफिक आठवड्यातुन एक ते दोन वेळा विजयपूर येथे भेटण्यासाठी येत होता. विजापूर रोडवरील आठ एकर जमीन माझ्या नावे कर व मला पैसे दे असा तगादा ती लावत होती. या प्रकरणावरून सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मिटवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती ऐकत नव्हती. मोबाईलवर बोललेली आॅडिओ क्लिप तिने सोशल मिडियावर व्हायरल करून रेश्मा ब्लॅकमेल करीत होती. १६ मे रोजी तौफिक रेश्माला भेटण्यासाठी विजयपूर येथे गेलो होता. तिला गाडीत बसवून तो कोलारकडे निघाला. वाटेत तौफिक आणि रेश्मा यांच्यात बाचाबाची झाली, त्यामुळे कारमध्येच तिचे नाक व तोंड दाबून मारल्याची कबुली तौफिक याने दिली अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रकाश निकम यांनी दिली. 

तो खून झाल्यापासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, जहिराबाद, तेलंगणा आदी ठिकाणी पळत होता. आमच्या दोन पथकाने त्याचा सातत्याने पाठलाग केला. शेवटी तो इंडी तालुक्यातील धुळखेड येथील सागर लॉजवर असल्याची माहिती मिळाली. रविवारी दुपारी लॉजवर जाऊन तौफिक शेख याच्यासह दोघांना अटक करण्यात आली, असेही प्रकाश निकम यांनी सांगितले. 

तौफिक याला १४ दिवसांची पोलीस कोठडी...च्घटनेच्या दिवशी कोलार ब्रिजच्या खाली पाणी असल्याचे समजुन, तौफिक तिला फेकुन निघुन गेला. मात्र ब्रिज खाली पाणी नव्हते, सध्या उन्हाळा असल्याने तो भाग कोरडा आहे. रेश्माच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही पोलीस अधिक्षक प्रकाश निकम, डीवायएसपी महेश गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली तौफिक याचा तपास केला. सोमवारी दोघांना विजयपूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायाधिशांनी १६ जुन पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती विजयपूर येथील कोलार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव शिरट्टी यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

‘तु झुट्टा..मै नही झुट्टी’ आॅडियो झाला होता व्हायरल- रेश्मा पडेकनूर आणि तौफिक शेख यांच्यामध्ये भांडणे झाली होती.  तौफिक शेख याच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा    दाखल केला होता. रेश्मा यांनी तौफिक याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. परस्परांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तौफिक शेख करीत होता. दरम्यान एमआयएमचे नगरसेवक व कार्यकर्ते पोलीस आयुक्तांना भेटले होते. हा एक राजकीय स्टंट असल्याचे निवेदन दिले होते. कार्यकर्त्यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांना मुलाखत देवुन या प्रकरणासाठी काँग्रेसने रेश्माला पैसे दिले आहेत असे सांगितले होते. यावर खुन होण्याच्या काही दिवसापूर्वी तिने फोन करून तौफिकला जाब विचारला होता. फोनवर बोलाताना रेश्मा म्हणाली होती की... राजकीय पीडित है ये... काँग्रेसने मुझे पैसे दिये, काँग्रेसने मुझे पैसे दिये की तु लिये मेरे पाससे पैसे. देख अब मैं तेरा अगला पिछला सब रिकॉर्ड निकालती हूँ, मेरे को काँग्रेसवाले पैसे दिये ये साबीत होना अब. जो सच्चाई है वोच बोलनेका, अब मिटानेकी बात कररा क्या मुझे नय मिटाने का. तु झुट्टा..., तेरी बिवी झुट्टी..., तेरी खांदानी आदत है। काँटर केस झुट्टे करने की. हे दोघांमधील बोलण्याची आॅडीयो रेकॉर्डिंग सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. 

माझ्यावर केलेला खुनाचा आरोप खोटा : तौफिक- २२ एप्रिल रोजी माझ्यावर रिव्हॉल्व्हर व खंडणीचा दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे. ज्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात होतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला बदनाम करण्यासाठी राजकीय षडयंत्र रचण्यात आले होते. गेल्या महिन्यात रेश्मा पडेकनूर यांचा खून झाला, त्यात विनाकारण माझे नाव घेण्यात आले आहे. माझ्या बाबतीत खालच्या पातळीवर घाणेरडे राजकारण करण्यात आले आहे.  माझा न्यायालयावर विश्वास आहे, खºयाचं खरं होईल, खोट्याचं खोटं होईल अशी प्रतिक्रिया दिलेली तौफिक शेख याची बातमी काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस